Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीलेखी हमी मिळाल्याने ‘श्रीराम’ कारखाना कामगारांचे उपोषण स्थगित

लेखी हमी मिळाल्याने ‘श्रीराम’ कारखाना कामगारांचे उपोषण स्थगित

फलटण: फलटणच्या श्रीरामम सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कामगार ग्रॅच्युईटीची रक्कम न मिळाल्यामुळे दि. 17 सप्टेंबरपासून फलटण येथील अधिकार गृहासमोर अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले होते. सुमारे साठ कामगारांची 2 कोटी रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम 30 नोव्हेंबरपर्यंत देण्याची लेखी हमी कारखाना प्रशासनाने लेेेखि दिल्याने आज  कामगारांनी उपोषण स्थगित केले.
2012 साली श्रीराम सहकारी साखर कारखान्यातून सुमारे दीडशे कामगार सेवानिवृत्त झाले होते. पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम देणे बंधनकारक असतानासुद्धा श्रीराममच्या व्यवस्तापनाने न दिल्याने 2012 पासून हे निवृत्त कामगार ग्रॅच्युईटीच्या रकमेसाठी लढा देत होते. सुमारे एक वर्षापूर्वी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम त्वरित अदा करावी, यासाठी लढा उभारला होता. यावर दोन महिन्यांपूर्वी श्रीराममने निवृत्त 90 कामगारांची चार कोटी रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम अदा केली होती. 60 कामगारांची सुमारे 2 कोटी रुपयांची देणी देणे श्रीराम बाकी होते. मात्र, श्रीराम या 60 कामगारांबाबत चालढकल करीत होते.
अखेर दि. 17 सप्टेंबर रोजी या 60 कामगारांची ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्यासाठी कामगारांनी फलटण येथील अधिकारगृहासमोर अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात केली होती.  त्यानंतर काल श्रीरामचे डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले, कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर यांनी उपोषणस्थळी जावून निवृत्त कामगारांना उपोषण सोडण्याबाबतची विनंती केली. मात्र, दोन कोटी घेतल्याशिवाय जागचे हालणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण फलटण शहर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर कारखान्याच्या चेअरमनसह व्यवस्थापनाने फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्यासमोर ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याची लेखी हमी दिली.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular