Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीश्रीरंग तांबे यांची मतदार नोंदणी केंद्रास भेट ; ११ केंद्रावर बीएलओ गैरहजर...

श्रीरंग तांबे यांची मतदार नोंदणी केंद्रास भेट ; ११ केंद्रावर बीएलओ गैरहजर , कारणे दाखवा नोटीसा.

पाटण:- मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत विशेष मोहिमेच्यि निमित्ताने रविवारी पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी मतदार नोंदणी भेटी
दिली असता ११ केंद्रावर बीएलओ उपस्थित नसल्याचे आढळून आले . त्या सर्वांना दोन दिवसात कारणे दाखवा नोटीस देऊन पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.
पाटण तालुक्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून त्यानिमित्ताने दर रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवमतदारांनी व ज्यांचे नाव अद्याप मतदार यादीत आले नाही अशा नागरीकांनी जवळच्या मतदान केंद्रावर या महिन्याच्या प्रतेक रविवारी संपर्क साधून नाव नोंदनी करावे असे अहवान पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आसताना या कामात हलगर्जी पणा दाखवून पाटण तालुक्यातील अकरा मतदार नोंदणी केंद्रावर बीएलओ गैरहजर असल्याचे श्रीरंग तांबे यांनी केलेल्या भेटी दरम्यान आढळुन आले. राहुडे – १५८, वजरोशी -१३२ , तारळे भाग क्र. १२२, १२३ , १२४, १२५ , १२६ ,१२९ , गुजरवाडी १६६ ,जुगाईवाडी -९५, सडावाघापूर -११७ . या आकरा गैरहजर बीएलओ यांना दोन दिवसात कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वरील नोटीस चा समर्पक खुलासा मुदतीत प्राप्त न झालेस लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५o अन्वये त्यांच्यावर कारवाई करणेत येणार आहे. असे पाटण उपविभागिय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular