Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीम्हसवड येथील शुभम भारत गॅस यांच्यावतीने श्रमदान

म्हसवड येथील शुभम भारत गॅस यांच्यावतीने श्रमदान

म्हसवड : गोंदवले खुर्द गावाने गाव पाणीदार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले असून गेले अनेक दिवस हे गाव मोठ्य प्रमाणात श्रमदान करत आहे याच्या आपला पण वाटा असावा म्हणून म्हसवड येतील शुभम भारत गॅस यांच्या स्टाफच्या वतीने श्रमदान करण्यात आले व पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली गोंदवले खुर्द गाव नक्की पाणीदार होईल असे प्रतिपादन सुनिल पोरे यांनी केले
माण तालुक्यातील सर्व भागात मोठ्या प्रमाणात भयानक दुष्काळी परिस्थिती असून जनतेला पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे तर तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमान खूप कमी असून पडणारे पावसाचे पाणी ओढा व नदी द्वारे वाहून जात असल्याने जमीनीची पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत जात असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते असून यावर काही तरी उपाय योजना करणे गरजेचे आहे आसे लोकांना वाटू लागल्याने लोक स्वतः हुन वॉटर कप च्या माध्यमातून लोक प्रत्यक्ष कामाला लागले
श्रमदानाच्या जोरावर हे वाहून जाणारे पाणी आपण अडवले तर आपली गावातील व गाव सभोवताली असणार्‍या पाण्याची पातळी वाढून आपले गाव पाणीदार होऊ शकत असा विश्वास लोकांना वाटू लागला आणि लोकांनी कामाला सुरुवात केली. श्रमदानातून सी सी टी, नालाबांध, लूज बोर्डर यांच्या माध्यमातून हे काम सुरू असून त्यांच्या जोडीला आपण पण काही तरी केले पाहिजे या उद्देशाने म्हसवड येतील शुभम भारत गॅस एजन्सी यांच्या वतीने श्रमदान करपूररीं आले.
यात श्री सुनील पोरे साहेब व त्यांचा सर्व स्टाफ यात सामील झाला आणि या कामासाठी इंधनला पाच हजार रुपये देणगी दिली व शुभेच्छा देण्यात आल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular