सातारा : दिवड ता. माण येथील शुभम सावंत यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. दि. 9 डिसेंबर 2017 रोजी ऑफिसर्स ट्रेनिंग अॅॅकॅडमी गया (बिहार) या ठिकाणी शुभम सावंत यांना लेफ्टनंटपदी नियुक्ती देण्यात आली. यावेळी अफगाणिस्तानचे आर्मी चिफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद शरीफ यफ्तली यांच्या हस्ते ब्राँझ मेडल देऊन त्यांना गौरविण्यात आले. ले. शुभम यांचे आई वडील प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा धुळदेव या ठिकाणी घेतले. इयत्ता 5 वी जि.प. प्राथ. शाळा निनाम येथून त्यांची सैनिक स्कूलसाठी निवड झाली. इ. 12 वी नंतर शुभम सावंत यांची एनडीए, नेव्ही इंजिनिअरींग तसेच आर्मी इंजिनिअरींगसाठी निवड झाली होती परंतु त्यांनी आर्मी इंजिनिअरींगला प्राधान्य देऊन पुणे येथे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगला ते प्रविष्ट झाले. तेथे ट्रेनिंग पूर्ण करत असताना ते सिल्व्हर मेडलसह द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. शालेय जीवनात शुभम हा उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावाजला आहे. दरम्यान क्षेत्रमाहुली ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने जि.प. साताराचे सिईओ डॉ. कैलास शिंदे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. पुनिता गुरव यांच्या हस्ते दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा. लेफ्टनंट शुभम सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शुभम सावंत यांची लेफ्टनंटपदी निवड
RELATED ARTICLES