Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसिध्देश्‍वर कुरोली येथे श्री सिद्धेश्वर रथोत्सव उत्साहात

सिध्देश्‍वर कुरोली येथे श्री सिद्धेश्वर रथोत्सव उत्साहात

वडूज : कुरोली ता खटाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा वार्षिक रथोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविक भक्तांनी गुलाल खोबर्‍याची उधळण करत सिद्धेश्वराच्या नावाने गजर केला. चालुवर्षी रथावर 2 लाख, 31 हजार 840 रुपयांची देणगी जमा झाली. देणगी रकमेत गेल्या वर्षी पेक्षा 13 हजार रुपयांची वाढ झाली.
सकाळी मान्यवर प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रथ पूजन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार डॉ अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पाटील, मंडलाधिकारी श्री जगताप, सरपंच सौ शीतल देशमुख, उपसरपंच अमरजीत देशमुख, गाव कामगार तलाठी श्रीमती डाके, ग्रामविकास अधिकारी विकास मदने आदी सह यात्रा कमिटीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
रथपूजनानंतर सिद्धेश्वर महाराज की जय च्या जय घोषात रथाचे मार्गक्रम सुरू झाले. एसटी बस स्थानक ,पाण्याची टाकी, जामा मशीद, पाटोळे गल्ली, जिल्हा परिषद शाळा, बाजारपेठ, ग्रामपंचायत, सुतार नेट, वडार वस्ती, साई चौक मार्गे रथयात्रा रात्री उशिरा मंदिर परिसरात आली. रथ मार्गावर एसटी बस स्थानक , ग्रामपंचायत मैदान, व अन्य प्रमुख ठिकाणी मोठ्या दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या.
बसस्थानक नजीकची दहीहंडी जाखनगाव येथील भैरवनाथ तरुण मंडळाने तर चावडी चौकातील सुशिक्षित बेरोजगार दूध संस्थेची दहीहंडी गावातील जनता राजा ग्रुप ने फोडली . विजेत्या मंडळास मार्केटिंग फेडरेशनचे संथापक अमृतराव देशमुख, माजी उपसभापती एस पी देशमुख, हणमंतराव देशमुख, डॉ विवेक देशमुख, शशिकला देशमुख, धनंजय क्षीरसागर, बबनराव माने, दीपक देशमुख, गोरख बनसोडे, अशोक कांबळे, आदी सह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular