सातारा : जिल्ह्याचे विद्यमान लाडके खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील स्मार्ट एक्स्पो गु्रपच्या व्यवस्थापना अंतर्गत दुसरे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती स्मार्ट एक्स्पोचे इव्हेंट मॅनेजर सोमनाथ शेटे यांनी दिली.
सैनिक स्कूलच्या मैदानावर दि. 23 फेबु्रवारी ते 27 फेबु्रवारी दरम्यान आयोजित केलेल्या या प्रदर्शनात देशातील नामवंत कंपन्यांचे 300 हून अधिक स्टॉलचा सहभाग राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत आयोजित केलेल्या या प्रदर्शनात यामध्ये शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग्याच्या,शेतकर्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने, पशु पक्षी प्रदर्शन, डॉग शो, दुर्मिळ देशी 500 हुन बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन, 3 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांची प्रदर्शनास भेट, तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, नवीन तंत्रज्ञान, पिक स्पर्धा, राजधानी कृषी पुरस्कार, सौर ऊर्जा विषयक दालने, खास आकर्षण,भारतातील सर्वांत मोठा,, 150 किलोचा पंजाबी बोकड ,पाहण्याची सुवर्णसंधी, जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोम्बी व 140 ते 150 दाणे तयार होणारी कुदरत 100 व 8 इंच लांबीची लोम्बी कुदरत 17 ही देशी बियाणे…चे माहिती व प्रदर्शन, सेंद्रीय शेती साठी विशेष मार्गदर्शन देणारी दालने, गोड्या पाण्यात मोत्यांची शेती संदर्भात माहीती, शेतकर्यांना त्यांच्या शेतीमाल/ बियाणे विक्रीसाठी मोफत स्टॉल, जगातील सर्वांत लांब 1फूट लांबीची देशी मिरची, खास आकर्षण एक टन वजनाची गाडी ओढणारा जगातील सर्वात आक्रमक श्वान.व गाडी ओढण्याचे प्रात्यक्षिक, फळे व फुले प्रदर्शन व स्पर्धा, गाई ,म्हैशी व बैल प्रदर्शन व स्पर्धा, माकड पळवून लावणारे लहान यंत्र, सर्प विषयक माहीती देणारे चित्र प्रदर्शन, देशी गायीच्या गोमूत्रा पासून 20 रु.पासून 20000 लिटर पर्यंतच्या घरच्या घाटी औषध बनविण्याची प्रक्रिया उद्योगाची माहिती, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन आदीचा सहभाग असणार आहे.या प्रदर्शनात दि. 25 फेब्रुवारी रोजी भव्य डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 1 टन वजनाची गाडी ओढणारा कुत्रा व दीडशे किलोचा बोकड हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहेत. हे प्रदर्शन मागील वर्षी प्रमाणेच या ही वर्षी सातारा जिल्हा वासियांची विक्रमी गर्दी खेचणारे ठरेल असे सोमनाथ शेटे यांनी सांगितले.