Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसामाजिक कार्यकर्ते विद्याधर भोसले व पांडूरंग जवळ मित्रपरिवार यांचे वतीने कातकरी समाजाला...

सामाजिक कार्यकर्ते विद्याधर भोसले व पांडूरंग जवळ मित्रपरिवार यांचे वतीने कातकरी समाजाला मदत

मेढा ( वार्ताहर ) :- मेढा येथिल कातकरी समाजावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना विदयाधर भोसले व पांडुरंग ( बापू ) जवळ मित्र परिवार यांनी अन्नधान्य स्वरूपात मदत करून आधार दिला आहे.
मेढा येथे मासेमारी करून उदर निर्वाह करणारा कातकरी समाज आपले पोट भरण्याचा प्रयत्न करत असतानाच या समाजावर कोरोनाने वक्रदृष्टी फिरवल्याने मोठया समस्येला सामोरे जावे लागत आहे.एकिकडे लॉक डाऊन वाढत जात असतानाच मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने आणि कोरोना रुग्ण कातकरी वस्तीमध्ये सापडल्याने त्यांच्यामध्ये चिंता वाढू लागली असून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आ वासून उभा राहिला असतानाच या कठीण काळात मेढा येथिल सामाजिक कार्यकर्तते विदयाधर भोसले आणि पांडूरंग ( बापू ) जवळ मित्र परिवार यांनी सामााजिक भावनेतुन कातकरी समाजातील लोकांना मदत करणेच्या दृष्टीने त्यांना जेवणाची सोय होणेसाठी स्वखर्चातून अन्नधान्य साहित्य रुपात मदत केली आहे सदरचे साहित्य जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सतीश बुद्धे , मेढा नगरपंचायत मुख्याधिकारी श्री अमोल पवार यांचेकडे जमा करणेत आले आहे. यावेळी नगरपंचायत स्थापत्य अभियंता श्री जाधव ,मंगेश गोरे तसेच मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पांडूरंग ( बापू ) जवळ, नगरसेवक विकास देशपांडे, शशिकांत गुरव,तसेच मेढ्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मेढा येथे कातकरी समाज प्रामाणिकपणे काम करत आपला उदरनिर्वाह करीत आहे. आज त्यांच्यावर कोरोनारूपी संक्रमणाचे संकट कुटुंबावर आल्याने या परिस्थीतीत त्यांना उपयुक्त अन्नधान्य देत आम्ही सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे-
श्री.विद्याधर भोसले
सामाजिक कार्यकर्ते मेढा

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular