सातारा (एकनाथ थोरात) : गावाच्या कब्जेवहिवाटीत असणारी सर्व जाती धर्मातील लोकांची स्मशानभूमी सर्व्हे नं. 291/12/ब असून त्याच्या नोंदीत बेकायदेशीर फेरफार करुन 7/12 च्या इतर हक्कातील 10 गुंठ्याचा शेरा रद्द केला आहे. स्मशानभूमीचा स्वतंत्र 7/12 मिळावा, अन्यथा 26 जानेवारी रोजी स्मशानात सरणावर बसून ग्रामस्थ आमरण उपोषण करतील या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोनगाव ग्रामपंचायतीच्यावतीने दिले आहे. याबाबत सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनगाव तर्फ सातारा येथील उरमोडी नदीच्या पुलाशेजारील सर्व्हे नं. 291/12/ब मध्ये 10 गुंठे क्षेत्रामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांची वहिवाट हक्काची स्मशानभूमी आहे. गेल्या अनेक वर्षापासून या स्मशानभूमीचा वापर सर्व जाती धर्मातील लोक दहनासाठी करीत आहेत. स्मशानभूमीत दहन करणेसाठी बांधलेले पत्र्याचे शेड वगळता इतर जमिनीवर वहीवाट सर्व धर्मातील लोकांची आहे. स्मशानभूमी वरील उर्वरीत जागेवर सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14 व्या वित्त आयोगातून प्रतीक्षागृह पुरुष व प्रतीक्षागृह महिला शौचालय, पाण्याचा हौद, बगीचा, बाके तसेच संपूर्ण जागेस तारेचे कुंपन करण्यात येणार आहे. या कामासाठी 14 व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद केली आहे. सदसरचा निधी हा सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा आहे. दरम्यान, सर्व्हे नं. 291/12/ब मधील 10 गुठे स्मशानभूमिची जमिनीची नोंद 7/12 उतार्यावर सरपंच ग्रामपंचायत सोनगाव असा उल्लेख अपेक्षित आहे. 10 गुंठे जमिनीचा नोंदीचा केलेला फेरफार दुरुस्त करुन नविन 7/12 उतारा मिळावा म्हणून सोनगाव ग्रामस्थ 26 जानेवारीला सकाळी 11 वा. स्मशानात सरणावर बसून आमरण उपोषण करतील, अशी माहिती सरपंच पांडूरंग नावडकर यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचायतीतर्फे सातारा तहसिलदार, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सातारा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांना दिले आहे.
उपोषण मागे घेण्याचे तहसिलदारांचे आवाहनसोनगाव तर्फ सातारा येथील ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनादिवशी थेट स्मशानभूमित सरणावर बसून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, चर्चेला सरपंचासह ग्रामस्थांनी यावे असा संदेश सातारा तहसिलदार चव्हाण यांनी दुरध्वनीव्दारे दिला आहे. तसेच उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले आहे.
उपोषण करण्यावर ग्रामस्थ ठामस्मशानभूमिची 10 गुंठे जमिनीचा 7/12 स्वतंत्र मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा लढा पुकारला आहे. 26 जानेवारीच्या ग्रामसभेत आता ग्रामस्थ काय निर्णय घेतील त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, मात्र आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत हे मात्र निश्चित. पांडूरंग नावडकर, सरपंच
26 जानेवारीला स्मशानात सरणावर बसून आमरण उपोषण करण्याचा सोनगाव ग्रामस्थांचा निर्धार
RELATED ARTICLES