सातारा (एकनाथ थोरात) : कुळकायदा सन 1989 च्या अंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार जमिन संपादनासाठी स्वतंत्र प्रस्ताव द्यावा, यानंतर सोनगाव तर्फ सातारा येथील स्मशानभूमिचा प्रश्न मार्गी निघेल तसेच स्मशानभूमिच्या स्वतंत्र 7/12 उतारा देणे सोपस्कर होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा विभागाचे तहसिलदार सावंत यांनी दिली. सोनगाव तर्फ सातारा येथील उरमोडी नदीच्या पुलाशेजारी असणार्या सर्व्हे नं.291/12/ब मधील 10 गुंठे जमिनीवर स्मशानभूमी सर्व जाती धर्मातील लोकांची असून गेल्या अनेक वर्षापासून तशी वहिवाट आहे. या स्मशानभूमित दहन करण्यासाठी पत्र्याचे शेड उभे केले आहे. सोनगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमिच्या ठिकाणी 14 व्या वित्त आयोगातून प्रतीक्षागृह पुरुष व प्रतीक्षागृह महिला शौचालय, पाण्याचा हौद, बगीचा, बाके तसेच संपूर्ण जागेस तारेचे कुंपन करण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी 14 व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद केली आहे. निधी हा सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा आहेे. मात्र, सर्व्हे नं. 291/12/ब मधील 10 गुंठे स्मशानभूमिची जमिनीची नोंद 7/12 उतार्यावर सरपंच ग्रामपंचायत सोनगाव यांच्या नावे नाही, तसेच सदर सर्व्हेनंबर मध्ये स्मशानभूमिच्या जागेमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याने दि. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोनगाव ग्रामस्थांनी स्मशानात सरणावर बसून आमरण उपोषण करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा तहसिलदार, प्रांताधिकारी सातारा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांना दिले होते. दरम्यान, या संदर्भात गुरुवार दि. 24 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सोनगाव ग्रामपंचायत सरपंच पांडूरंग नावडकर, उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रामसेवक मदन जगताप यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता विशेष बैठक घेवून स्मशानभूमिच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 10 गुंठे जमिन संपादन करण्यासाठी शासनाच्या कुळकायदा कलम 1989 च्या परिपत्रकानुसार प्रस्ताव तयार करावा, यासाठी सर्व्हे नं. 291/12/ब चा 7/12उतारा, चतु:सिमा, नकाशा आदी उत्तारे जिल्हा परिषद व सातारा पंचायत समिती व प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा विभागाचे तहसिलदार सावंत यांनी बैठकीत दिली. यावेळी पोलीस विभागाचा प्रतिनिधी म्हणून पोळ उपस्थित होते. चर्चेवेळी सातारा तहसिल कार्यालयाचा प्रतिनिधी उपस्थित नव्हते.बैठकीनंतर तुर्त उपोषण स्थगित26 जानेवारीला सोनगाव ग्रामस्थांनी स्मशानभूमिच्या जमिनीबाबत स्मशानभूमित सरणावर बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आमच्या निवेदाची दखल जिल्हा प्रशासनाने घेवून गुरुवारी चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित केले होते. त्या प्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा घडून आल्याने आम्ही आमचे तात्पुरते उपोषण मागे घेत आहोत. पांडूरंग नावडकर, सरपंच
जिल्हाधिकार्यांच्या आश्वासनानंतर सोनगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
RELATED ARTICLES