सातारा : नव्याने उभारण्यात येणारे रंगमंच हे हौशी कलाकारांसाठी फायद्याचे ठरणार असून या रंगमंचामुळे नविन कलाकारांना रंगभूमीमध्ये येण्यासाठी वाव मिळणार आहे, असे गौरवोद्गार रंगकर्मी आनंदराव हेळकर यांनी काढले.
सोनगाव तर्फ सातारा येथील भौरवनाथ मंदिरासमोरील नव्याने बांधण्यात येणार्या रंगमंचाचे कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख म्हणून सरपंच पांडूरंग नावडकर, उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रामसेवक मदन जगताप, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल नावडकर, सर्जेराव नावडकर, शरद जाधव, रामचंद्र नावडकर, काकडे पुजारी, विश्वास नावडकर यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना रंगकर्मी आनंदराव हेळकर म्हणाले, सातारा कोल्हापूर निर्मित नाट्य तरण या संस्थेच्या माध्यमातून मी नादायची नाही अर्थात गाढवाचं बारस या लोकनाट्यास लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्याचे पश्चीम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 25 प्रयोग यशस्वी झाले होेते. शाहू कलामंदिर, पोलीस करमणूक केंद्र, साखरवाडी, फलटण, वाई, वडूज, दहिवडी, कोरेगाव, येथे व्यवसायीक प्रयोग झाले होते. या प्रयोगात सहकलाकार वर्षा उसगावकर, माया जाधव. शोभा सासवे, अभिनेते सयाजी शिंदे, यांनी मी नादायची नाही, अर्थात गाढवाचं बारस या नाट्यप्रयोगात यशस्वी भूमीका केली होती. विशेष म्हणजे या नाट्य प्रयोगात सहकालाकर म्हणून काम केलेले केशवबापू, आनंदराव नावडकर, दिनकर नावडकर, यदू धोंडवड, साहेबराव मुळीक, हे आज हयात नसल्याने थोडे मनात दु:ख होत आहे. उगवत्या पिढीने रंगभूमिची परंपरा जतन करावी, असे आवाहन केले. यावेळी सरपंच पांडूरंग नावडकर यांनी कलेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी अशोक जाधव, यांच्या हस्ते आनंदराव हेळकर यांचा श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते.
रंगमंच हौशी कलाकारांसाठी फायद्याचा ठरेल : आनंदराव हेळकर
RELATED ARTICLES