Thursday, June 19, 2025
Homeताज्या घडामोडीस्पंदन ट्रस्टच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार

स्पंदन ट्रस्टच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार

तळमावलेः नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट सर्वांनाच परिचित आहे. ट्रस्टने आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजमनावर उमटवला आहे.
नुकतेच 10 वी, 12 वी व इतर शालांत परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळयाचे सामान्यपणे आयोजन केले जाते. बर्‍याचदा अशा कार्यक्रमांना पालकांना उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे पाल्याचा सत्कार त्याच्या पालकांच्या समोर झाला तर त्यांना किती आनंद होईल हा विचार स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांच्या मनात आला आणि त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जावून करण्याचे नियोजन केले. अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर यांनी लिहलेले शिवाजी महाराज आणि शिलेदार हे पुस्तक, शाल, कंदी पेढे देवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सौ.सविता निवडूंगे, छायाचित्रकार अनिल देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे ट्रस्टच्या लोकसहभागातून राबवलेल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सातत्य आणि नावीन्यता आहे. यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर-बॅग वाटप, नाम फाऊंडेशनला मदत, अक्षरश्री उपक्रमातून केरळला मदत, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, माजी सैनिक हणमंत पाटील मदत, एक अक्षर गणेश कलाकृती उपक्रम, भारत के वीर खात्यात मदत, एक ओंजळ अनाथांसाठी, कुठरे-जांभूळवाडी शाळेला प्रतिमा वाटप, वृक्षारोपण, पत्रिकेतून समाजप्रबोधन, मान्यवरांचे स्वागत शाल ऐवजी पुस्तकाने, गणेशमंडळास भेटी देवून मानपत्र प्रदान,, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा,एक दिवा जवानासांठी, ग्रंथतुला करुन पुस्तके वाटप, वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, प्राईड ऑफ स्पंदन अ‍ॅवार्ड, किल्ले बनवा स्पर्धा, सॅल्युट कार्ड स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, गणेशोत्सव वार्तांकन स्पर्धा, दिवाळी अंक स्पर्धा इ. उपक्रम राबवले आहेत. सामाजिक उपक्रम राबवण्यात ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी यांचा मोलाचा वाटा असतो.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular