Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीराज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. चा 71 वा वर्धापन दिन महाबळेश्वर आगाराच्या...

राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. चा 71 वा वर्धापन दिन महाबळेश्वर आगाराच्या वतीने विविधतेने व उत्साहात संपन्न

महाबळेश्वरः 1 जून हा राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. चा वर्धापन दिन असतो .या वर्षीचा 71 वा वर्धापनदिन महाबळेश्वर आगारातर्फे विविधतेने व उत्साहात साजरा करण्यात आला .या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाबळेश्वर एस. टी. स्टेंड पुष्प माळांनी व रांगोळी काढून सजविण्यात आले होते तसेच आगारातील बहुत सर्व गाड्यांनाहि पुष्प हार घालून सजविण्यात आले होते.
महाबळेश्वर आगाराने या सुदिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याचा शुभारंभ महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बी .ए. कोंडूभैरी तसेच महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकाच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक कोंडूभैरी तसेच अन्य मान्यवर व प्रवासी पर्यटक यांचे स्वागत महाबळेश्वरचे आगारव्यवस्थापक एन. एम. पतंगे व आगाराचे अन्य कर्मचारी प्रतिनिधी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून करण्यात आले .फुलांनी सजविलेल्या एस .टी. बस च्या समोर केक कापून तसेच सर्वांना मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला व एस. टी. च्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याच दिनानिमित मान्यवरांच्या हस्ते एस. ंी. बस मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना हि गुलाब पुष्प देवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी महाबळेश्वर आगाराचे महेश शिंदे ,अमोल शेलार,रोहिदास कुतवड ,विकास कांबळे ,सौ. दीप्ती गायकवाड ,अजित जमदाडे ,शिवाजी भोसले ,सौ.गावित ,सौ.साळवेकर ,मेचाकर ,वळकुंभे ,सर्व कार्यशाळा कर्मचारी तसेच चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular