Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपाटणच्या स्टेट बँकेवर विक्रमबाबा यांचा हल्ला-बोल

पाटणच्या स्टेट बँकेवर विक्रमबाबा यांचा हल्ला-बोल

रिझर्व्ह बँकेच्या जाचक अटीत पाटणची स्टेट बँक

पाटण:- स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-पाटण या बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने काही जाचक अटी लादून पाटण तालुक्याची बैंकेतील स्ट्रेजरी कराड येथे हलविण्यात आली आहे. यामुळे पाटण येथील स्टेट बँकेत ठराविक रक्कमेतच व्येव्हार होणार आहेत. याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकां पासून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालय स्टेट बँकेच्या अदीपत्यात राहणा-या सर्व बैंका, पतसंस्था, सोसायट्या, एस.टी. डेपो यांना बसणार आहे. यात पाटणची आर्थिक व्यवस्था कोलमडून जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पाटणच्या स्टेट बँकेवर घातलेल्या जाचक अटी रद्द केल्या नाहीतर सोमवार दि. ५ रोजी पाटण स्टेट बँकेसमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी दिला आहे.
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-पाटण ही बैंक पाटण तालुक्यातील नागरीकांची तसेच शासकीय- निमशासकीय कार्यालये, स्टेट बँकेच्या अदीपत्याखाली येणाऱ्या तालुक्यातील सर्व बैंका, पतसंस्था, सोसायट्या यांच्यासाठी आधार स्तंभ आहे. या बैंकेत पाटण तालुक्यातील सरासरी सर्वच आर्थिक व्यवहार असतात. असे असताना रिझर्व्ह बॅंकेच्या काही जाचक अटी मुळे पाटण येथील बैंकेतील स्ट्रेजरी कराड येथे हलविण्यात आली आहे. पाटण येथील स्टेट बँकेला ठराविक रक्कमे पर्यंत व्यवहार करण्याचे आदेश दिले आहेत. याचा फटका पाटण तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांसह शासकीय- निमशासकीय कार्यालये, सर्व बैंका, पतसंस्था, सोसायट्या,एस.टी. डेपो, उध्दोग व्यवसायिक यांना बसणार आहे. यांचा दररोजचा भरणा आर्थिक व्यवहार कराड येथे करावा लागणार आहे. आणि दररोज आर्थिक व्यवहारासाठी लागणारा भरणा कराड येथून आणावा लागणार आहे. यामुळे पाटण- कराड या ४० कि.मी. अंतरावर सुरक्षेतेचा प्रश्र्न निर्माण होणार आहे.
सर्व सामान्य नागरिकांना देखील खराब झालेली १०० रुपये ची नोट कराड येथे जाऊनच बदलावी लागणार आहे. म्हणजेच “१०० रुपेयला १०० रूपये घालवा आणि नोट बदला”. असा प्रकार होऊन बसला आहे. पाटण स्टेट बँकेतील स्ट्रेजरी बंद झाल्याने याची अर्थीक जळ सर्व सामान्यसह पाटण तालुक्याला बसणार आहे. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पाटण स्टेट बँकेवर लादलेले निर्बंध सोमवार दि. ५ मार्च पर्यंत मागे घेतले नाहीतर पाटण स्टेट बँक समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सातारा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटण येथे दिला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, पाटण तालुका पत्रकार संघ अध्यक्ष शंकर मोहिते, स्टैंप व्हेल्डर तालुका संघटना अध्यक्ष हणमंत पवार, रिक्षाचालक वाहक मालक संघटना अध्यक्ष भास्करराव शिंदे, पाटण नगरपंचायत माजी सरपंच चंद्रकांत मोरे, माजी सदस्य विक्रांत कांबळे, अनिल भोसले, बाबासो सुतार, विद्या म्हासुर्णेकर-नारकर, सुरेश संकपाळ, नामदेव कुंभार, आदी उपस्थित होते.

फोटो- स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटण व्यवस्थापक देशपांडे यांना निवेदन देताना विक्रमबाबा पाटणकर आदी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular