सातारा :- नागपूर येथे झालेल्या 9 व्या सब ज्युनियर मुलांच्या व 19 व्या जुनियर मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीच्या नेत्र दीपक यश प्राप्त केले. यामध्ये मयुरेश मंगेश जाधव याने 61-64 वजन गटामध्ये आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तसेच जुनियर मुलींमध्ये श्रावणी महेश मुळे हिने 63-66 वजन गटामध्ये अत्यंत सुंदर खेळाचे प्रदर्शन करत रोप्य पदक मिळवले. मयुरेश मंगेश जाधव याची बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना कोच अमित सागवान यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा.अध्यक्ष जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन. सातारा जिल्ह्यातील सर्व बॉक्सिंग क्लब राजधानी स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सर्व खेळाडू कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राजधानी बॉक्सिंग अकॅडमीला सुवर्णपदक
RELATED ARTICLES