कराड ः कृष्णा उद्योग समुहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या 94 व्या जयंती निमीत्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित राज्यस्तरीय निमंत्रीत कबड्डी स्पर्धेत पुरूष संघात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना शिवनगर व महिला संघात शिवाजी उदय सातारा या संघांनी अजिंक्यपद पटकावले.
कराड तालुका साखर कामगार संघ व श्री. गणेश शिवोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या 94 व्या जयंतीनिमीत्त कारखाना कार्यस्थळावर राज्यस्तरीय निमंत्रीत पुरूष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) क्रिडानगरी शिवनगर येथे या स्पर्धा पार पडल्या.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषीक वितरण करण्यात आले. यावेळी माजी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, अमोल गुरव, संजय पाटील, गिरीष पाटील, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, पैलवान आनंदराव मोहिते, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर, श्री.गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, वसंतराव साळुंखे, ज्ञानदेव पाटील, प्रा. संजय पाटील,सर्जेराव पाटील, मोहनराव शेटे, सुरेश साळुंखे, बाबुराव यादव, एस.के.शिंदे, श्रीराम राजहंस आदींसह कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
महिला कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक जागृती पुणे, चतुर्थ क्रमांक महालक्ष्मी कोल्हापूर या संघानी पटकावले. पुरूष संघामध्ये जयहिंद इचलकरंजी संघाने तृतीय क्रमांक तर क्रांतीसिंह कासेगाव या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. सोनाली हेळवी शिवाजी उदय सातारा व महेश पवार कृष्णा कारखाना हे अष्टपैलू खेळाडू ठरले. उत्कृष्ट चढाई चे मानकरी मृणाली टोणपे बाचणी कोल्हापूर व संकेेत पाटील कृष्णा कारखाना तर उत्कृष्ट पकडचे मानकरी ऐश्वर्या गिरीगोसावी व सौरभ गावडे नवभारत शिरोली हे ठरले. स्पर्धेचे पंचप्रमुख रमेश देशमुख, पंच म्हणून संजय पाटील, तानाजी देसाई, निवास पाटील, बापू वगरे, संतोष पाटील, संजय जाधव, जयराज पाटील, विकास पालकर, काका भिसे, अविनाश ढमाळ, सुजय संकपाळ, महेश कुंभार, अमोल मंडले, आदींनी काम पाहीले. रामभाऊ सातपुते यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.
राज्यस्तरीय कबड्डी स्पधेत शिवाजी उदय सातारा संघ अजिंक्य
RELATED ARTICLES