कोरेगांव: अमगांव (गोंदिया) येथे पार पडलेल्या 8 व्या राज्यस्तरीय मोन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाने अमरावती संघावर मात करत विजेतेपद पटकावले.
गोंदिया येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात राज्यातील 16 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात अमरावती संघावर मात करुन सातार्याच्या संघाने विजेतेपद पटकावले. आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर यांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरविण्यात आले. सातार्याच्या संघाला प्रशिक्षक म्हणून केतन भिसे, संघ व्यवस्थापक रोहन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या सातारा संघात ओम केसरकर, प्रज्वल कापसे, चिन्मय भुजबळ, सिध्दांत लोखंडे, साईदत्त साबळे, सर्वेश बोतालजी, वेदांत शेलार, सुयोग जाधव, पियुष जोशी, वेदांत भागवत, निखील गायकवाड यांचा समावेश होता. राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटाकवलेल्या सातारा संघाचे सातार्यातील क्रीडा प्रेमींनी जल्लोषात स्वागत केले आहे.
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सातारा संघ विजेता
RELATED ARTICLES