सातारा , दि. 10- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनतर्फे 16 आणि 17 जुलै रोजी 10 ते 55 वर्षांपर्यंतच्या सर्व वयोगटांच्या जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणीचे आयोजन सातारा जिल्ह्यात करण्यात आले आहे. गुरुकुल एज्युकेशन सोसायटी येथे ही निवड चाचणी होणार आहे. अशी माहिती सातारा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्र चोरगे यांनी दिली.
यातून निवडलेला संघ १६ ते १८ ऑगस्ट रोजी संगमनेर येथे होणाऱ्या महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या राज्य स्पर्धेसाठी पाठवला जाईल. योगासनांचा आशियाई स्पर्धांमध्ये प्रवेश निश्चित झाला असल्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी
जिल्हा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा. या स्पर्धांचे वयोगट, अभ्यासक्रम तसेच प्रवेश अर्जाबाबत जिल्हा समन्वयक, सातारा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन च्या सेक्रेटरी नीलिमा खांडके (9021362463) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा योगआसन स्पोर्ट्स असोसिएशन च्यावतीने करण्यात
आले आहे.