पाटण :- गतवर्षापासून कोरोना काळात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जोपासत फ्रन्टलाईन वर्कर म्हणून प्रशासनासोबत काम केले आहे. याकाळात राज्यातील सुमारे पाच हजार पत्रकार कोरोना बाधित झाले आहेत. १२२ च्या वर पत्रकारांचे मृत्यू कोरोनानं झाले आहेत. यामुळे पत्रकारांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण आहे. अशा वातावरणात पत्रकारांना दिलासा मिळेल असा एकही निर्णय सरकार घेत नसल्याने सरकारच्या उदासिन धोरणाच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेसह राज्यभरातील पत्रकारांचे अन्नत्याग व आत्मक्लेष आंदोलन महाराष्ट्र दिनी झाले आहे. या आंदोलनात सहभागी होत पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारच्या उदासिन धोरणाच्या निषेधार्थ पाटण तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
या निवेदनात पुढे म्हणले आहे. महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, पत्रकारांसाठी ऑक्सीजन आणि व्हेटिलेटरची सोय असलेले बेड राखीव ठेवावेत, पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून संबोधावे कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जावी या मागण्या आम्ही आपणाकडे सातत्यानं केल्या आहेत. इ-मेल आंदोलनाच्या माध्यमातून एक हजार मेल पाठवून विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने पत्रकारांची कोणतीच मागणी पूर्ण केली नाही. त्याची दखलही घेतली नाही. उलटपक्षी अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी असलेली मुंबईतील लोकल प्रवासाची सुविधाही काढून घेतली. या सर्वांमुळे माध्यम जगतात मोठा संताप आणि असंतोष आहे.
आजवर राज्यात सुमारे ५००० पत्रकार कोरोनाबाधित झाले असून १२२ पत्रकारांचे मृत्यू कोरोनानं झाले आहेत. जवळचे मित्र एकापाठोपाठ एक जात असल्याने पत्रकारांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण आहे. अशा वातावरणात पत्रकारांना दिलासा मिळेल असा एकही निर्णय सरकार घेत नसल्याने आज महाराष्ट्र दिनी (१ मे) पत्रकारांच्यावर आत्मक्लेष करून घेण्याची वेळ आली आहे. पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील पत्रकारांवर आत्मक्लेष आंदोलनाची वेळ पून्हा येणार नाही, याची काळजी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोंपे यांना निवेदन देताना पाटण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, सचिव विद्या म्हासुर्णेकर, माजी अध्यक्ष शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, पत्रकार सुरेश संकपाळ, संजय कांबळे, सिताराम पवार, संदिप भोळे, पि.के. कांबळे, श्रीगणेश गायकवाड आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
सरकारच्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ पाटण तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ; मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आत्मक्लेष आंदोलनास पाठिंबा
RELATED ARTICLES