पुसेगाव – ( विशाल सुर्यवंशी ) गेल्या चार दिवसापासून खटाव तालुका शिवसेना यांच्या वतीने वर्धनगड या ठिकाणी जिहे कठापूर प्रश्नी ठिय्या आंदोलन चालु होते. या आंदोलनाची दखल कृष्णा खोरे महामंडळाने घेतली. दुपार पर्यंत वर्धनगड बोगदा याठिकाणी जिहे कठापूरचे रखडलेले काम पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मशनरी दाखल झाल्याने शिवसेनेचे आंदोलन यशस्वी झाल्याचे उप जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी सांगितले
सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री विजय घोगरे यांनी खटाव तालुका शिवसेना यांना आंदोलन मागे घेण्यासाठी लेखी पत्र दिले. पण जोपर्यंत वर्धनगड बोगदा याठिकाणी काम चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन चालु ठेवण्याच पवित्रा प्रताप जाधव यांनी घेतला प्रत्यक्ष दुपारी कामाच्या ठिकाणी मशनरी आणि पाईप दाखाल झाले यावेळी शिवसैनिकांनी श्रीफळ वाढवून कामाला सुरवात केली.
यावेळी श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज,शिवसेना नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांतजी शिंदे, चेअरमन डॉ सुरेश जाधव ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव
खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर, भानुदास कोरडे सर,महिपती नाना, संजय घोरपडे, आकाश जाधव ,अस्लम शिकलगार, सचिन गवळी, रामभाऊ जगदाळे, एन पी कदम,शिवाजी शिर्के, आमीन आगा, यशवंत जाधव, रवी फाळके, संजय नांगरे,बाळासाहेब लावंड, संभाजी नलवडे, निखिल राऊत, दिलीप नलवडे,सुमित्रा शेडगे,सुरज जाधव, सचिन महाजन,व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या ठिय्या आंदोलनाला यश ; कामाची मशनरी वर्धनगड मध्ये दाखल
RELATED ARTICLES