Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीतेलबैला सुळक्यांवर सह्याद्रिच्या गिर्यारोहकांची यशस्वी चढाई

तेलबैला सुळक्यांवर सह्याद्रिच्या गिर्यारोहकांची यशस्वी चढाई

सातारा : शिवदुर्ग मित्र, लोणावळा व येथील सह्याद्रि ट्रेकिंग सातारा या गिर्यारोहण संस्थाच्या गिर्यारोहकांनी अलिकडेच तैलबैला सुळके चढाई मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. महाराष्ट्रातील कसलेला गिर्यारोहक गणेश गिध यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस ही मोहीम सुरु होती. या दरम्यान, दोन्ही संस्थांच्या गिर्यारोहकांनी 150 फूट, 200 फूट व 300 फूट उंचीचे तीन सुळक सर केले. यावेळी शिवदुर्ग मित्र लोणावळ्याचे गिर्यारोहक व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ सुनिल गायकवाड, राजू कडू, आनंद गावडे व रोहित वर्तक दिनेश पवार यांनी प्रत्यक्ष भेटून प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
या साहसी मोहिमेमध्ये सातार्‍याच्या सह्याद्रि ट्रेकिंगचे गिर्यारोहक कैलास बागल, प्रतिक साळुंखे, अनिल दाणी, राधिका यादव, अथर्व अवसरे, पौर्णिमा खंडेलवाल यांनी तर लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या गणेश गिध, योगेश उंबरे, समीर जोशी, राहुल गेंगजे, सतीश बोबडे, प्रशांत कदम (मुंबई) यांनी यशस्वी सहभाग घेतला
सुळक्यानंतर यशस्वी चढाई (समीट) केल्यानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देवून एकमेकांचे अभिनंदन करत सुळके सर केल्याचा आनंदोत्सव साजरा केला. या मोहिमेबद्दल विविध स्तरांतून गिर्यारोहकांचे अभिनंदन होत आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular