वडूज : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे खटाव तालुक्यातील धारपुडी येथील संभाजी शामराव देशमुख व शेनवडी येथील विजय ज्ञानदेव घोडके या दोन कर्जदारांना ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर (ऊस तोडणी यंत्र) वितरीत करण्यात आले.
हार्वेस्टरसाठी बँकेमार्फत 1 कोटी 25 लाखाची मशिन खरेदीसाठी बँकेने अर्थसहाय्य केले आहे. वरील शेतकर्यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याशी करार केला असून म्हासुर्णे येथे झालल्या कार्यक्रमात मशिनच्या चाव्या वितरीत करण्यात आल्या. यावेळी बँकेचे संचालक व कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक प्रदिप विधाते, प्रा. अर्जुनराव खाडे, सर व्यवस्थापक एम. व्ही. जाधव, विभागीय विकास अधिकारी यु. के. देशमुख, विकास अधिकारी जयवंत गोडसे, बी. एस. देसाई, एस. आर. खाडे, खटाव शाखाप्रमुख धैर्यशिल फडतरे, श्री. कारंडे, श्री. शिंगाडे, श्री. अहिवळे, श्री. जाधव, श्री. काटकर, श्री. राऊत आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा बँकेमार्फत ऊस तोडणी यंत्राचे वितरण
RELATED ARTICLES