Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसुनिता दळवी यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित

सुनिता दळवी यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित

भुईंजः सुनिता दळवी यांना आदर्श माता पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले. कोथरूड पुणे येथे तिळवण तेली समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या भव्य वधुवर मेळाव्या प्रसंगी सौ.सुनिता जयसिंगराव दळवी यांना आदर्शमाता पुरस्काराने चंदुकाका सराफ ज्वेलर्सच्यावतीने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.रमेश भोज़ तेली समाज पुणे अध्यक्ष रामदासजी धोत्रे़ आशिष काटे सातारा जिल्हा तेली समाज्याचे गजाननराव दळवी़ संजय भगत़ तैलीक महासभेचे जयसिंगराव दळवी़ भारती फल्ले़ गिता भोज़ पप्पु देवमाने़ निलम कहाणे़ प्रमोद भोज़ पिंटूशेठ दळवी़ तेजस दळवी इ.मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी बोालताना सौ.सुनिता दळवी म्हणाल्या की़ आई वडीलांच्या आणि संताजी महाराज यांचा आशिर्वादाने आज पर्यंत मी घडले गेले त्यामुळेच मी माझ्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकले याचा मला अभिमान वाटतो.
आदर्शमाता पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल काँगेसचे जेष्ठ नेते प्रतापराव भोसले भाऊ़ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण़ किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले़ आ.शशिकांत शिंदे़ आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले़ परळीचे सरपंच सोमनाथ दळवी यांनी सौ.दळवी यांचे अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular