पुसेसावळी : भारत सरकारच्या गांधी ग्लोबल सौर यात्राया उपक्रमांतर्गत स्टुडंट सोलर म्बेसिडर 2019 ही कार्यशाळा खटाव तालुक्यातील जयराम स्वामींचे वडगाव येथील जयरामस्वामी विद्यामंदिरात संपन्न झाली.
गंभीर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि जगभरातील तरुणांची मने तयार करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय भारत सरकार, एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांनी आयआयटी बॉम्बेच्या मदतीने स्वतःचे सौर अभ्यास दिवे बनविण्यासाठी हॅण्ड्स-ऑन ट्रेनिंगदेण्यासाठी विद्यार्थी सौरदूत राजदूत कार्यशाळा सुरू केली.
100 पेक्षा जास्त देशांमधील लाखो विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हे प्रशिक्षण घेतले.यामध्ये जयराम स्वामी विद्यामंदिर या शाळेने सहभाग घेतला.
स्टुडंट सोलर म्बेसिडर 2019 प्रोग्रामसाठी एक महिना आधी सुरवात झाली होती.आयआयटी पवईने दोन शिक्षकांना 16 तासाचे ऑनलाईन ट्रेनिंग देऊन,स्किल अॅण्ड डेव्हलपमेंट इंडीया सर्टीफिकेट दिले.सचिन पवार आणि अवधुत शिंदे हे प्रथम प्रशिक्षित झाले.नंतर 50 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.सोलर कीट मागविण्यात आले.त्यात पूर्ण सोलर लॅम्पचे सुटे पार्टस् होते.आयआयटीने दिलेल्या प्रक्रिया चेकलिस्टने सकाळी 9 वाजता सुरवात झाली.सर्व शिक्षक,विद्यार्थ्यांनी सौर प्रकाश तयार करुन पर्यावरण रक्षण करत आहोत अशी प्रतिज्ञा घेतली.आपण या जागतिक चळवळीचा एक भाग आहोत आणि यात सामील होत आहोत असे म्हणून कार्यशाळेस आरंभ केला.सुमारे 5 तास कार्यशाळा चालली होती.अनेक इलेक्ट्रॉनिक्स पार्टस् एकत्र करून त्यांचे उपयोग समजावून घेऊन अत्यंत एकाग्रपणे जोडणी करण्यात आली आणि शेवटी सगळ्याच्या चेहर्यावर हसू उमटले.सगळ्याचे सौरदिवे प्रकाशित झाले.सर्व विद्यार्थी हे सौरदिवे आता स्वतःसाठी घरी वापरणार आहेत.तसेच सर्वांना त्याची दुरुस्तीही करण्याची क्षमता आली आहे. आयआयटीचे सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना विज्ञानशिक्षक सचिन पवार व अवधुत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य संजय पिसाळ,पर्यवेक्षक बी.ए. घाडगे यांची प्रेरणा मिळाली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास घार्गे, सचिव अंकुश घार्गे व संचालक मंडळ यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
सौरदिवे प्रकाशमय झाले अन… चेहर्यावर आनंदाची झळाळी आली
RELATED ARTICLES