कराड : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून कराड अर्बन स्पोर्टस् क्लब आणि सातारा जिल्हा योग परिषद कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक सूर्यनमस्कार व स्पर्धा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : इयत्ता पाचवी ते सातवी मुले-प्रथम-करण जयसिंग परिपार, आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर, द्वितीय-स्वानंद सदानंद घाटे, सरस्वती विद्यामंदीर, तृतीय-अभिजीत दौडमणी, आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर, उत्तेजनार्थ-पार्थ चैतन्य मिरजकर, कल्याणी इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्तेजनार्थ- मैत्रेय कुलकर्णी. इयत्ता पाचवी ते सातवी मुली-ऋतुजा अर्जून पाटील-प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळा मलकापूर, द्वितीय-श्रावणी संतोष चिवटे, सरस्वती विद्यामंदीर, तृतीय-दिक्षा चव्हाण, पोदार स्कूल, उत्तेजनार्थ-अनुजा अनिल निकम, विठामाता विद्यालय, उत्तेजनार्थ-अंतर्या विजय शिर्के, विठामाता विद्यालय.
इयत्ता आठवी ते दहावी मुले-प्रथम-निखील पाटील, एस. एम. एस. स्कूल, द्वितीय-पराग बुरांडे, पालकर शाळा, तृतीय-अथर्व सोनवणे, एस. एम. एस. स्कूल, उत्तेजनार्थ-अक्षय माने, आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर, उत्तेजनार्थ-रोहित संकपाळ, टिळक हायस्कूल, कराड. इयत्ता आठवी ते दहावी मुली-प्रथम-प्रणिता हणमंत यादव, दि. का. पालकर शाळा, कराड, द्वितीय-वैष्णवी विष्णू पवार, विठामाता विद्यालय, कराड, तृतीय-संस्कृती पाटील, एस.एम.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड, उत्तेजनार्थ-सोनाली उत्तम जाधव, कराड अर्बन स्पोर्टस् क्लब, कराड, उत्तेजनार्थ- साक्षी दिलीप राजमाने, एस.एम.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड.
खुला गट पुरूष, प्रथम- कुलदीप पवार, द्वितीय-राहूल शहा, तृतीय-दीपक तोडकर, उत्तेजनार्थ-विकास माळी, उत्तेजनार्थ-महेश पानस्कर. खुला गट महिला, प्रथम-अल्पना जाधव, द्वितीय-शर्वरी जाधव, तृतीय-अश्विनी सावंत, उत्तेजनार्थ-श्रध्दा कदम, उत्तेजनार्थ-निता लोहाना. सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रत्येक गटातील विभागात तीन क्रमांकांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत कराड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी व संस्थामधील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी कराड अर्बन स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, बँकेचे संचालक डॉ. अनिल लाहोटी, सातारा जिल्हा योग परिषद कराड चे सचिव प्रदीप वाळींबे, प्रशासन विभागाचे उप महाव्यवस्थापक माधव माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक बापूसो यादव, मार्केटींग विभागाचे व्यवस्थापक सुहास पवार, कराड अर्बन स्पोर्टस् क्लबचे सचिव जगदीश त्रिवेदी व सेवक उपस्थित होते. बँकेचे संचालक डॉ. अनिल लाहोटी यांनी दैनंदिन जीवनात सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून दिले. चांगले आरोग्य हवे असेल तर सूर्यनमस्कार घालणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून मंशाराम सचदेव, महालींग मुंढेकर, नारायण घाटे, आण्णा होमकर, सदानंद घाटे, गजानन कुसूरकर, अपूर्वा लाटकर, स्मिता वेल्हाळ, कविता घाटे, रामचंद्र लाटकर यांनी कामकाज पाहिले.