फलटण :-: पिल्याने त्यास उलटी,चक्कर सारखे ञास होऊन जिंती येथिल दोघेजण मृत पावले आहेत.
फलटण ग्रामीण पोलिस ठाणे तून व घटनास्थळा वरुन मिळालेली माहीती अशी की सध्या देशात लॉकडाऊन असल्याने सर्वञ दारुविक्री बंद असल्याने अनेक दारुचे व्यसन करणार्याचे दारु पायी बेचैन झाल्याचे पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी तर दारुविक्रीची दुकाने या महाभागाने फोडून दारु लंपास केली असल्याच्या घटना घडल्या आहेत.तर काहीजणांनी हातभट्टी लावून दारु तयार करणेचा उद्योग सुरु केला आहे पोलिस प्रशासन धाडी टाकून भट्या उध्वस्त करुन अवैध्य दारु जप्त करत आहेत तरीपण दारु शौकीनांचा नाद काय कमी होत नाही.दारुचे व्यसन करण्यासाठी काही महाभाग वेगवेगळ्या नामी शक्कल लढवित आहेत.
असाच प्रकार जिंती येथे मागील आठदिवसात दारुचे व्यसन असणाऱ्या तिघांनी दारु भेटत नाही म्हणून व्यसनापाई दारु सदृश लिक्विड पिल्याने त्यास उलटी चक्कर सारखे ञास जाणवू लागल्याने त्यास फलटण येथिल खाजगी दवाखान्यात आणला असता त्याच्यावर उपचार करुन घरी पाठविण्यात आले.दि.२६ रोजी किरण सुरेश सावंत वय ३२,दिपक राघु जाधव वय ३० याचे दि.२७ रोजी तर अशोक रणवरे वय २२ हा दि.२५ रोजी या सर्वांना उलटी चक्कर ञास एकसारखा झाल्याने त्यांना फलटण येथिल खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते .त्याच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले होते .परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच ञास झाल्याने यात या दोघेही मृत झाले असून। एक जण गंभीर आहे . .याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत संबधित सागर राघु जाधव रा.जिंती वय २९, मधुकर सखाराम रणवरे वय ५२ यांनी वेगवेगळ्या खबर दिली असून अधिक तपास फलटण ग्रामीणचे पोलिस अधिकारी करीत आहेत.
………. जिंती येथिल होमकॉरटाईनचा शिक्का असणारे दारुचे व्यसनी किरण सुरेश सावंत वय ३० दिपक जाधव वय ३० यांनी देखील दारु सदृश लिक्विड पिल्याने मृत झाला असून काहींनी व्यसनापाई सँनिटाईझर पिले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.यामुळे जिंती गावात घबराटीचे वातावरण झाले आहे.
दारु सारखे लिक्विड पिल्याने दोघांचा मृत्यू ; व्यसनापाई सॅनिटाईझर पिले असल्याची शंका ; जिंती तालुका फलटण येथील घटना
RELATED ARTICLES