Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसुयशचे ग्रंथ प्रदर्शन वाचन संस्कृतीला बळ देणारे : राजेेंद्र माने

सुयशचे ग्रंथ प्रदर्शन वाचन संस्कृतीला बळ देणारे : राजेेंद्र माने

सातारा : सुयश ग्रंथवितरण संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्याहस्ते नगर वाचनालय येथे झाले. यावेळी कवी प्रदिप कांबळे, ग्रंथपाल रुपाली मुळे, प्रा. श्रीधर साळुंखे, वर्षा कोडगुले, केतन मानारकर, प्रविण रक्ते उपस्थित होते.
त्यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. राजेंद्र माने म्हणाले, गेली अनेक वर्ष सुयश ग्रंथवितरण संस्थेचे केतन भानारकर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही सातत्याने ग्रंथप्रदर्शन घेवून जात आहेत. कथा, कादंबरी, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य पाकशास्त्र, ऐतिहासिक, कविता संग्रह व इतर अनेक प्रकारची पुस्तके वाचकांना त्यामुळे एकत्रित उपलब्ध होतात.
केतन भानारकर यांनी उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ भेट देवून स्वागत केले. या प्रदर्शनात विविध विषयांची हजारो पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
नगर वाचनालयात हे प्रदर्शन सुरु असून वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केतन भानारकर यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular