Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीउपासना भक्तीपूर्ण व श्रध्दायुक्त असावी : बापूसाहेब जाधव ; स्वकुळ साळी...

उपासना भक्तीपूर्ण व श्रध्दायुक्त असावी : बापूसाहेब जाधव ; स्वकुळ साळी समाज संघटना आणि सातारा शहर स्वकुळ साळी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान श्री जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त आयोजित समारंभ उत्साहात

सातारा : उपासना भक्तीपूर्ण व श्रध्दायुक्त असावी व जीवनात प्रत्यक्ष कृतीचा जोड असावी, अशी शिकवण झाली पुराण यातून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी देणारे भगवान श्री जिव्हेश्‍वर यांचे सतत स्मरण करुन संघटीत होणे हे देश कल्याणासाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव यांनी केले.
सातारा शहर स्वकुळ साळी समाज संघटना आणि सातारा शहर स्वकुळ साळी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान श्री जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी गोडोली सातारा येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्पर्धेतील बक्षिस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, यावेळे व्यासपिठावर सौ. शकुंतलला जाधव, साळी समाज संघटना अध्यक्ष मधुकर जंत्रे, उपाध्यक्ष पांडूरंग बिचकर, कार्याध्यक्ष सुरेश पांढरपट्टे, सचिव उमेश घटे, खजिनदार कालीदास पांढरपट्टे, सदस्य विश्‍वासराव ठोके, धोंडीराम शिंगरे, संजय पांढरपट्टे, श्रीहरी डिंगणे, सुनिल दिवाणे, जगन्नाथ भंडारे, श्रीकांत डिंगणे,सुभाष पांढरपट्टे, छत्रपती डांगरे, सौ. अरुंधती पांढरपट्टे, सल्लागार डॉ. संजय ठोके यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव म्हणाले, वेदकाळानंतर पौराणिक काळाची सुरुवात झाली. हा काळ म्हणजे इ. सन पूर्वी दोन हजार वर्षापूर्वीचा काळ. या पौराणिक काळात श्री भगवान जिव्हेश्‍वराची उत्पत्ती, भगवान शंकराच्या जिव्हेपासून झाली. सर्व देवतांचे मान राखण्यासाठी रक्षावस्त्र निर्माण करणे हे जिव्हेश्‍वराचे काम होते आणि ते त्यांनी केले. ब्रम्हदेवाच्या मुली अंकिनी व दंशकिनी या भगवान जिव्हेश्‍वराच्या पत्नी होत. जीवनात प्रत्यक कृतीची जोड असावी, अशी शिकवन जिव्हेश्‍वर यांनी दिली आहे. त्यांचे अनुकरण सर्वांनी करावे.
यावेळी सौ. शंकुतला जाधव यांनी ओंकार व त्यांचे महत्व प्रात्यक्षिकरित्या समाजाला पटवून दिले.
भगवान जिव्हेश्‍वर जन्मकाळ सुर्योदयला भगवान जिव्हेश्‍वर विजय स्वकुळ महाल्य ग्रंथ वाचून, सुर्योदयसमयी महिलांच्यावतीने पालण व आरती करण्यात आली. ग्रंथ वाचन श्री छत्रपती डांगरे तसेच मूर्ती पूजन श्री जंत्रेसर यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी समाज बांधवाची वाषिंक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत केरळ पुरग्रस्त निधी 12700 रुपये द्यावा असे निश्‍चित करण्यात आले. पैकी सातारा शहर संघटना यांचेकडून 5001 रुपये विश्‍वास ठोके 1000 रुपये रामचंद्र पवार 1000 रुपये, डॉ. ठोके 1000 रुपये, डॉ. प्रमोद कोदे 1000 रुपये, जगन्नाथ भंडारे 1000 रुपये, सौ. सिंधू जंत्रे 1000 रुपये, सुरेश पांढरपट्टे 500 रुपये, सुभाष पांढरपट्टे 500 रुपये ऋषीकेष जयदेवकर 200 रुपये असे एकूण 12700 रुपये जमा झाले. तसेच आद्य वस्त्रनिमिता भगवान जिव्हेश्‍वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाठविण्याचे ठरले त्यानंतर लकी ड्रॉ घेण्यात आला.
दिवसभरात समाजातील विद्यार्थ्यांसाठी व महिलासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध गुणदर्शनामध्ये महिलांनी संगीत खुर्ची व रेकार्ड डान्स केला. त्यामध्ये संगीत खर्ची विजेता सौ. राजश्री ठोके व शैला ठोके याचा सत्कार करण्यात आला. डान्स गु्रपचे काम सौ. राजश्री ठोके  यांनी केले त्यांचा सत्कार करण्यात आला. लकी ड्रामध्ये चंद्रकांत पांढरपट्टे व सुजाता घटे विजयी झाले त्याचा सत्कार करण्यात आला. उत्सवासाठी महाप्रसादाचे योगदान श्री व सौ. डांगरे, श्री व सौ. पोरे व श्री व सौ. कुराडे यांनी केले. पुढील वर्षाचा महाप्रसाद श्रीमती संगीता कोळेकर व श्री संतोष घटे यांनी देण्याचे आश्‍वासन दिले. नियोजीत जोगेवर भगवान जिव्हेश्‍वर सांस्कृतिक भवन लवकरात लवकर उभे रहावे यासाठी समाजिक सर्व बांधवांनी सदळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले. तसेच समाज बांधवाचा उत्कर्ष होण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. निर्भयापथक प्रमुख व त्यांचे सहकारी यांचे बहुमोल मार्गदर्शन समाज बांधवांना करण्यात आले. व निर्भयपथक अधिकारी सौ. विजया वंझारी यांनी स्त्रीरक्षणासंबंधी माहिती दिली. प्रास्ताविकात सुरेश पांढरपट्टे याना पाहुण्याचा परिचय व समाज प्रबोधनपर माहिती दिली.
महिला अध्यक्षा म्हणून सौ. शैलजा ठोके यांना आपले समाजविषयचे मनोगत स्पष्ट केले. शहर प्रमुख जंत्रे यांनी श्री भगवान जिव्हेश्‍वर माहिती व नुतन वर्षातील संकल्पना यावर भाष्य केले. समाज बांधव म्हणून श्री छत्रपती डांगरे यांनी वस्त्राचा अवमान करु नये व इतर समाजउपयुक्त माहिती सांगून स्वत: समाजाच्या बांधिलकी म्हणून समाजापुढे शपथ घेतली. सत्कार मुर्ती उदयकुमार सांगळे चंद्रकांत पांढरपट्टे व अभिजीत पांढरपट्टे यांनी आपल्या कार्याचा आढावा समाजापुढे व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कोमल आंगलेकर हिने केले. आभार प्रदर्शन सुभाष पांढरपट्टे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान सौ. वंदना दिवाणे, सुजाता घटे, ज्योति चिलाळ आणि सौ. टपळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग बीचकर, सुरेश पांढरपट्टे, उमेश घटे, कालीदार पांढरपट्टे, छत्रपती डांगरे, दत्ता कुराडे, धनाजी पोरे, संजय पांढरपट्टे, भंडारे गुरुजी, सुभाष पांढरपट्टे, धोंडीराम हिंगारे, समाज सल्लागार म्हणून जयवंत ठोके, डॉ. प्रमोद कोदे, विश्‍वास ठोके, महिला सौ. वंदना दिवाणे, सौ. सुजाता घटे, माधवी डिंगणे, वसुधंरा वाल्हेकर, आशा ठोके, गिता ठोके, शैला कोदे, आश्‍विनी जयदेवकर, गिताजंली पागडे या सर्वांनी परिश्रम घेतले व भगवान जिव्हेश्‍वर जयंती सांगता झाली.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular