सातारा दि.31 – देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झली आहेत. त्याअनुषंगाने शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी सातारा मा. जितेंद्र डुडी यांचेकडील निर्देशानुसार सातारा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक अथवा त्यांचे जोडीदार यांचा सत्कार करणेत आला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. तसेच अनेक स्वातंत्र सैनिक यांनी बलिदान दिले म्हणूनच आपल्याला आज सन्मानाने व ताठ मानेने जगता येत आहे. अशा स्वातंत्र्य सैनिकांचा आपल्याला कधीही विसर पडणार नाही. आपण त्यांचा नेहतीच आदर व सत्कार केलाच पाहिजे.
सातारा तालुकयातील बाळकृष्ण गोविंद शेवाळे, केशव सदाशिव साठे या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार तहसिलदार राजेश जाधव यांचे हस्ते मानपत्र, शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून करणेत आला. तसेच स्वांतत्र्य सैनिक यांचे जोडीदार – उषाबाई शिवाजीराव चिंचणे, रुक्मीणी पांडुरंग कुंभार, हारुताई रामजी पाटील, गजराबाई बापूराव मोहिते, शांताबाई उत्तम म्हेत्रे, विमल केरुसिंग परदेशी, शकुंतला नारायण यादव, वंदना वसंतगिरी गोसावी, पार्वती शंकर पाटील, मुक्ताबाई शंकर घोरपडे, गुणाबाई बाजीराव बर्गे, सरुबाई तात्याबा सपकाळ, वानुबाई आण्णा मापारे, कोंडुबाई बळवंत यादव, व्दारकाबाई विश्वासराव ढाणे, पारुबाई उर्फे पार्वती शंकर बागल, द्रोपदा गोविंद घोरपडे, कुसूम नारायण शिंगटे, सिंधुताई मानसिंग शिंदे, शांताबाई शंकर शिंदे, यांचा सत्कार मंडल अधिकारी यांचे हस्ते हस्ते मानपत्र, शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ, श्रीफळ देवून करणेत आला.
त्याकरीता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिक अथवा त्यांचे जोडीदार यांचा सत्कार त्यांचे कुटुंबियांसोबत त्यांचे घरी जाऊन करणेच भाग्य मिळाले त्याबद्दल सातारा तहसिलदार राजेश जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. असा सत्कार आपल्याला करायला मिळणे हे आपले अहोभाग्यच आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे मुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभेागत आहोत. याचा आपणांस कधीही विसर पडणार नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
00