Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीतलाठी भरती प्रक्रिया सुरु ; 2 जुलै ते 26 जुलै दरम्यान परीक्षा

तलाठी भरती प्रक्रिया सुरु ; 2 जुलै ते 26 जुलै दरम्यान परीक्षा

सातारा : महापरीक्षा पोर्टल (माहिती तंत्रज्ञान) यांच्यामार्फत तलाठी पद भरती परीक्षा-2019 दि. 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 2.30 ते 4.30 अशा दोन बॅचेसमध्ये घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठया प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत शासन धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सदर भरती प्रक्रिया महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान विभाग) ह्या शासकीय विभागाच्या माध्यमातून ई-महा परिक्षा या पोर्टलवरुन करावयाची आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या आखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्तपदे भरण्याची कार्यवाही महा-आयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सदर परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होत आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभूत सोयी असणार्‍या शाळा/कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात येऊन राज्यभरात एकूण-122 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने पुढीलपैकी एक मूळ फोटो ओळखपत्र आणाणे अत्यावश्यक आहे. पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती, मतदान ओळखपत्र, मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक, आधार कार्ड, ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओखळपत्राची रंगीत झेरॉक्स, ई-आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफट कॉपी वैद्य ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकीटावर देण्यात आल्या आहेत. महापरिक्षा पोर्टलवरुन घेतल्या जाणार्‍या परीक्षा चालू असताना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परिक्षा केंद्रावर निरीक्षक म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परिक्षा नियंत्रक म्हणून प्रत्येकी एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापरिक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटावरील सूचनांचे उमेदवरांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ह्या संदर्भात अधिक माहितीसाठी/तक्रार नोंदविण्यासाठी महापरिक्षाचा टोल फ्री क्रमांक 180030007766 व शर्पिींळीूारहररिीळज्ञीरह.र्सेीं.ळप ह्या मेलवर सपंर्क साधण्याबाबत सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular