Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीतांबव्यात घुमला एक गाव एक शिवजयंतीचा नारा

तांबव्यात घुमला एक गाव एक शिवजयंतीचा नारा

कराड : तांबव्यात युवकांसह अबालवृध्द,महिलांच्या सहभागाने एक गाव एक शिवजयंतीचा नारा घुमला. तांबवे येथे 13 गणेशमंडळे आहेत. त्यातील शंभर युवकांनी एकत्र येवुन ही शिवजयंती एकजुटीने साजरी केली त्यासाठी सर्वांनी एकत्र येवुन ऐतिहासिक शिवकालीन वसंतगडावरील शिवज्योत सकाळी 9 वाजता तांबवे येथे आणली व तिची गावातुन मिरवणुक काढली.
युवकांबरोबरच महिलावर्ग व अबालवृध्द हे सर्व एकत्र आले.सन यंदा प्रथमच मराठी मानसाचा स्वाभीमान असणार्‍या श्री.छ.शिवाजी महाराज यांची जयंती तांबवे येथे मोठया जल्लोषात एकत्र येवुन साजरा केली. या मध्ये शिवजयंतीसाठी सर्वजन एकत्र आले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
कारणस्वत: शिवबांनी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील मावळयांना एकत्र आणलं होतं. आणि स्वराज्याची स्थापना केली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने पुन्हा तांबवे येथील मावळे एकत्र आले.
या कार्यक्रमासाठी शिवकालीन पारंपारीक पोषाक परिधान करून छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे व शिवज्योतिचे पुजन करण्यात दुपारी 3 वाजता शिवाजी महारांजांच्या पुतळयाची मिरवणुक काढण्यात आली त्यानंतर सायं 7 वाजता सतिश यादव यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular