Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीतामजाई नगर मध्ये वृक्ष लागवडीसाठी नागरिकांची लगबग

तामजाई नगर मध्ये वृक्ष लागवडीसाठी नागरिकांची लगबग

साताराः उन्हाने लाही लाही झाल्यामुळे पावसाची व झाडांची किंमत आता अनेकांना कळू लागली आहे . त्यातच शासनाच्या वन विभागातर्फे झाडे लावा असे आवाहन करण्यात येत आहे .या आवाहनाला प्रतिसाद देत तामजाई नगर येथील प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने ग्रीन तामजाई हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे . या निमित्ताने प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष चंदन जाधव यांनी नागरिकांना एकत्र करून रविवारी सुमारे दीडशे खड्डे खणले त्यामध्ये खत टाकून आता हे खड्डे बुजवले. येत्या रविवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात होणार आहे . या सर्व प्रकल्पासाठी चंदन जाधव, अभिजीत सावंत, सिद्धेश शिवणकर ,पटेल दादा ,प्रदीप निकम, शिवाजीराव भंडारे ,दरेकर ,शंकर भोसले, जय खुडे ,डॅनियल खुडे ,अमय राजमाने ,अक्षय संकपाळ ,ऋषिकेश तुपे ,रवी शिंदे ,अमोल चंद, सचिन लांडगे ,साळुंखे ,रासकर ,बोराटे सर ,फरांदे सर, अमित राजपूत ,राजमाने सर ,मोहिते ,जाधव सर ,निखिल कुंभार, वीरेंद्र रजपुत, रुद्र जाधव ,साईराज लांडगे, महेश पेटकर चव्हाण काका यांनी श्रमदान केले

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular