फलटणःतरडगाव ता.फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत विद्यार्थी यांनी एक आगळी वेगळी होळी साजरी केली.होळीचे औचित्य साधत या शाळेच्या वतीने पर्यावरण पुरक आणि अवगुणांची होळी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चोरी,खोटे बोलणे,आळस,व्यसन,द्वेष,अनादर, उद्धट बोलणे,अस्वच्छता इत्यादी अवगुणांचा प्रतिकात्मक राक्षस बनवून त्याचे होळीत दहन करण्यात आले. खरच आई वडील यांच्या प्रमाणेच शालेय जीवनात ही चांगल्या सवयी विद्यार्थी यांमध्ये येण्यासाठी शिक्षकी पेशाचे गुरु हे वेगवेगळ्या उपक्रमांतून कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतात.
वाईट सवयी दूर करुण चांगल्या सवयीना जवळ केले पाहिजे हाच उद्देश या उपक्रमांतुन घेण्यात आला होता.कृती शील कार्यक्रमांतून चांगले काय आणि वाईट काय यांतील फरक हा विद्यार्थ्यांना समजण्या च्या दृष्टीने हा उपक्रम हा मार्गदर्शक ठरतो आहे.विद्यार्थी यांनी तसेच तरडगाव परिसर आणि पालक वर्गांतुनही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले जाते आहे. या वेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण पुरक होळी, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर कसा करावा. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी यांनी वेग वेगळ्या दुर्गुणांच्या कागदी पट्टया बनविल्या .त्याचा उपयोग हा होळीत दहन करण्यासाठी करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ शोभा गायकवाड तसेच प्रतिभा घाडगे ,संजिवनी गायकवाड, उषा वाठारकर, सुलभा पाठक, शितल बुधनवर, अजित शिंदे,ज्ञानेश्वर नाळे आदि सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
तरडगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अवगुणांची होळी साजरी
RELATED ARTICLES