Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीबावधन येथील संकल्प संस्थेच्या वतीने सैन्यात भरती झालेल्या तरुणांचा सन्मान

बावधन येथील संकल्प संस्थेच्या वतीने सैन्यात भरती झालेल्या तरुणांचा सन्मान

वाई: देशसेवेसाठी भरती झालेल्या तरुणांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्यांच्या सत्कारातून आम्हाला निष्ठेची प्रेरणा मिळते. गावातील तरुणांना विधायक दिशा,जेष्ठांना आधार आणि गरजूंना सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून समाजातील चांगुलपणाची मजनजागृतीफ करण्यासाठी आमची संस्था आघाडीवर राहील,असा विश्वास संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांनी व्यक्त केला.
बावधन परिसरातील नुकतेच आर्मी मध्ये भरती झालेल्या तरुणांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार जनजागृती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था बावधन आयोजित कार्यक्रमात भोसले बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष- किसनराव कचरेसचिव- अशोक जाधवसंचालक- प्रकाश कदम,विलास ननावरे,रवी देशमुख, सुरेश पिसाळ, बाळासाहेब पिसाळ,बाळासाहेब जायकर,संतोष भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरेश पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर केला.तर संतोष भोसले यांनी संस्थेने गेल्या तीन वर्षात केलेल्यासामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी नुकत्याच आर्मी,नेव्ही मध्ये भरती झालेल्या शुभम कदम,चेतन कचरे,मनोज ठोंबरे,सोमनाथ लोहार,विशाल दाभाडे,रोहित दाभाडे,शुभम पिसाळ, प्रथमेश तरटे,नितीराज गहीन या तरुणांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी अजित पाटील, चंद्रकांत भोसले, मच्छिन्द्र पिसाळ,राजेंद्र्।चव्हाण यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत अशोक जाधव, विलास ननावरे यांनी केले तर प्रकाश कदम यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular