सातारा : मुंबई येथे पार पडलेल्या टाटा मुंबई हाफ आणि फुल मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. 2019 च्या मॅरेथॉमध्ये सातारच्या कालीदास हिरवे याने हाफ 21 कि. मी. अंतर अवघ्या 1 तास 6 मिनीटात पूर्ण करून कास्य पदक पटकावले. या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सुमारे 156 सातारकर स्पर्धकांनी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.
टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन 12994 स्पर्धकांनी पूर्ण केली. सातार्यातून हाफ 21 किमीसाठी 76 तर फुल 42 किमीसाठी 80 असे एकूण 156 स्पर्धक मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले. पत्रकार पांडुरंग पवार यांनी 21 किमी अंतर 1.46 मिनीटात पूर्ण करत 45 ते 49 या वयोगटातमध्ये 28 क्रमांक तर अजय बैताडे यांनी 1.43 मिनीटात पूर्ण करत 50 ते 55 गटामध्ये 9 क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे प्रथमच सातार्यातील 80 स्पर्धक फुल 42 कि. मी. अंतर धावले. या सर्व स्पर्धकांनी साडेचार तास ते सहा तासात ही स्पर्धा पूर्ण केली. तर टाटा मुंबईच्या व्यवस्थापनाच्या काही तांत्रीक चुकांमुळे माजी जिल्हा परीषदेचे सदस्य संदिपभाऊ शिंदे यांना 21 किमी अंतर धावता आले नाही. नंतर त्यांना 42 कि.मी चे अंतर धावावे लागले. संदिप शिंदे यांचा कोणताही सराव नसताना त्यांनी 42 किमी अंतर सहा तासात पूर्ण केले.
भल्या पहाटे 5.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) सुरू झालेली ही मॅरेथॉन सी लिंक, वानखेडे स्टेडियम, सिद्धिविनायक मंदिरमार्गे सीएसएमटीवर पोहोचली. पहाटेच्या मनोहारी वातावरणात आणि हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीमुळे मुंबईतील सी-लिंक मार्ग विलोभनीय वाटत होता. दुसर्या छायाचित्रात जनजागृतीचे फलक घेऊन धावणार्या हौशी स्पर्धकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
मुंबई टाटा मॅरेथॉनवर सातारचा वरचष्मा
RELATED ARTICLES