Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीम्हासुर्णे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

म्हासुर्णे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) :- म्हासुर्णे ता.खटाव येथे इनामदार(सर)यांच्या निवासस्थानी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सचिन माने व प्रमुख पाहुणे शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,बी.एन.इनामदार (सर),व्हि,एल.कुलकर्णी (सर),ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,नलिनी कुलकर्णी,गुलाब वायदंडे,संगिता गुरव,भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन अशोक माने,काशिनाथ माने,वडुज मार्केट कमेठी संचालक विलास माने,किसन माने,डॉ.ओंकार इनामदार ,जयश्री इनामदार मँडम यांच्या उपस्थित भारताचे मा.राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या फोटोचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरूवात झाली

शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमावेळी म्हासुर्णे गावातील व्हि.एल.कुलकर्णी,एम.व्हि.माने,ए.आर.दबडे,आर.जी.कुलकर्णी ,ज्ञानेश्वर इनामदार बी.एन.इनामदार,लिलावती माने मँडम,इनामदार मँडम या सर्व शिक्षकांचा सन्मान बी.एन.इनामदार सर यांच्या कुटुंबाच्या मार्फत करण्यात आला. जेष्ठ शिक्षक व्हि.एल.कुलकर्णी सर यांना ८१ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल त्याच्या आठवणींना उजाळा दिला.व्हि.एल.सर यांच्या आठवणी सरपंच सचिन माने चेअरमन महादेव माने,आर.जी.कुलकर्णी ,ए.आर.दबडे,हेमंत कुलकर्णी ,विलास माने,जयश्री इनामदार आपल्या भाषणातुन व्यक्त केल्या.या कार्यक्रमावेळी एम. पी .माने साहेब,विठ्ठल माने,नामदेव माने(बापु),विश्वास माने,संदिप माने,श्रीपाद कुलकर्णी,शांताराम कुलकर्णी,धनजंय कुलकर्णी,व म्हासुर्णे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्तविक बी.एन.इनामदार सर यांनी केले तर डॉ.ओंकार इनामदार यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular