पाटण ः पाटण तालुक्यातील वांग – मराठवाडी प्रकल्पातील मेंढ आणि उमरकांचन बाधित धरणग्रस्तांना एकरी 17 लाख रूपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या निर्णयाप्रमाणे धरणग्रस्तांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मुख्यमंत्री यांनी दिली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते भरत पाटील यांनी पाटण येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष कविता कचरे, उपाध्यक्षा आयेशा सय्यद, जिल्हा उपअध्यक्ष सागर माने, तालुका अध्यक्ष कमलाकर पाटील, सरचिटणीस फत्तेसिंह पाटणकर, दिपक महाडीक यांची उपस्थिती होती.
भरत पाटील पुढे म्हणाले वांग – मराठवाडी धरणग्रस्तांचे गेली 15 – 20 वर्ष प्रलंभित प्रश्न होते. या प्रश्नासांठी धरणग्रस्तांचा सतत लढा सुरू होता. मात्र या लढ्याला यश येत नव्हते. धरणग्रस्तांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मुंबई येथे मंत्रालयात बैठक लावून वांग – मराठवाडी धरणग्रस्तांच्या मागणीची दखल घेऊन धरणग्रस्तांना खास बाब म्हणून ऐकरी 17 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा या बैठकीत इतिहासिक निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुनर्वसन खात्याचे सचिव उपस्थित होते. डिसेंबर अखेर पुनर्वसन प्रक्रिया पुर्ण करून धरणग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश मुख्यमंत्री यांनी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देण्यात आले आहेत. तसेच धरणग्रस्तांचे पुनर्वसन पुर रेषेबाहेर होणार असल्याने धरणांचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाल्याने या योजनेचा फायदा धरणग्रस्तांना होणार असुन हा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. या बैठकीला उपस्थित आसलेल्या धरणग्रस्तांच्यां प्रतिनिधीनीं या इतिहासिक निर्णयाचे स्वागत करून भाजप सरकारचे आभार मानले.उमरकांचन येथील 80 धरणग्रस्तांसाठी गावठाणनिर्मितीचे आणि मेंढ येथील 60 कुटूंबाच्या पुनरवसनासाठी गावठाणाला जागा उपलब्ध झाली आहे. या सर्व बाबींची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन 31 डिसेंबर अखेर गावठाण प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. तर जिंती येथील 33 कुटूंबांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे असे भरत पाटील यांनी शेवटी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतिने पाटण तालुका पत्रकार संघाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर झाले बद्दल सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.