Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीप्रतापगड येथे डोक्यात दगड पडून मुलगा जागीच ठार

प्रतापगड येथे डोक्यात दगड पडून मुलगा जागीच ठार

महाबळेश्‍वर : किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी आपल्या कुटूंबासमवेत आलेला ओम प्रकाश पाटील (वय 13 रा. उफाळेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) हा किल्ल्याच्या पायर्‍या चढत होता त्याच वेळी शंभर ते दिडशे फुट उंच असलेल्या दगडी तटबंदीवर माकडांचा कळप धिंगाना घालत होते त्यांतील एका माकडाचा धक्का लागुन तटबंदीवरून निसटलेला मोठा दगड पायर्‍या चढत असलेल्या ओम प्रकाश पाटील याच्या डोक्यावर पडला या अपघातात ओम प्रकाश पाटील याचे डोके फुटले व तो जागीच ठार झाला.
प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले प्रकाश पाटील हे मुलांच्या शाळेला सुट्ट्ी लागली म्हणुन आपला सहावीची परीक्षा देवुन मोकळा झालेला मुलगा ओम दोन मुली प्रणोती व प्रणाली व पत्नी लता यांचे बरोबर आपल्या वाहनाने महाबळेश्‍वरच्या सहलीवर आले होते काल येताना त्यांनी औंध व सज्जनगडाला भेट दिली. आज सकाळी ते महाबळेश्‍वर दर्शन साठी बाहेर पडले ऑर्थरसीट व क्षेत्र महाबळेश्‍वर पाहुन दुपारी त्यांनी महाबळेश्‍वर येथे जेवण केले थोडी विश्रांती घेवुन दुपारी पावणे तीन वाजता ते किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी बाहेर पडले ते सव्वा तीन वाजता गडाच्या वाहनतळावर पोहचले त्यांनी वाहनतळावर आपली गाडी लावली व ते गडाच्या पायर्‍या चढायला सुरूवात केली.
जेथुन पायर्‍या सुरू होतात तेथे पायर्‍या वर भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी स्थानिक महीला बसत असतात या शेंगा हातात घेवुन पर्यटक हे गडावर चढत असतात काही पर्यटक शेंगा माकडांना खाण्यास देतात या आशेवर येथे मोठ्या प्रमाणावर माकडे जमा होतात ते तटबंदीवर इकडुन तिकडे कायम उडया मारत असतात मस्ती करीत असतात अनेक वेळा जर शेंगा दिल्या नाही तर हातातुन शेंगाची पुडी ती माकडे हिसकावुन घेतात जर दिले नाही तर ते अंगावर धावुन येतात परंतु आज प्रकाश पाटील यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. किल्ले प्रतापगडाच्या पायरया चढत असताना तटबंदीवरील माकडांचा धक्का दगडाला लागला व भला मोठा दगड हा खाली पायरया चढत असलेल्या ओमच्या डोक्यावर पडला.
या अपघातात ओमचे डोकेच फुटले तो जागीच कोसळला ओम कोसळलेले पाहताच ओमच्या आईने व दोन्ही बहीणीने हंबरडाच फोडला पाटील कुटूंबाचा हा आक्रोश ऐकुन उपस्थितांच्या डोळयात पाणी आले होते तर मन सुन्न झाले होते ओमच्या वडीलांना तर काहीच सुचेनासे झाले ओमची अवस्था पाहुन ते कोसळले पर्यटक व स्थानिक नागरीक हे पाटील कुटूंबाच्या मदतीला धावले त्यांनी तातडीने ओमला कुंभरोशी येथील रूग्णालयात दाखल केले परंतु तो जागीच ठार झाल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले तेथुन सायंकाळी ओमला शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular