पाटण:- माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अम्रुतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब पाटण या संस्थेने रविवार दि. ३ मार्च २०१९ रोजी भव्य बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे.
या बैडमिंटन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस ३००१/- रुपये प्रविण मोटे यांचे कडून, व्दितीय क्रमांकाचे बक्षिस- २००१/- रूपये डॉ. विलासराव नणावरे आणि डॉ. प्रल्हादराव चव्हाण यांचे कडून, त्रितीय क्रमांकाचे बक्षिस- १००१/- रुपये शंकरराव मोरे सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक विकास अधिकारी यांच्या कडून, चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस ७०१/- रुपये डॉ. नेमिनाथ खोत यांचे कडून तर सर्व विजेत्या खेळाडूनां प्राचार्य नितेश नाडे यांच्याकडून चषक आणि उत्कृष्ट प्लेयर चषक कै. सम्राट देशमुख यांच्या स्मरणार्थ राहुल पवार यांच्या कडून देण्यात येणार आहे. या स्पर्धा स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब चाफोली रोड पाटण येथे आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २५०/- रुपये आहे. इच्छुक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होणेसाठी राहुल पवार, यशवंतराव जगताप यांच्याशी संपर्क साधावा असे आहवान संयोजकांनी केले आहे.