Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीचार्टर अकाउंट कार्यालयाचे मायणीत शानदार उद्घाटन

चार्टर अकाउंट कार्यालयाचे मायणीत शानदार उद्घाटन

मायणी ःतालुका. खटाव जिल्हा .सातारा (सतीश डोंगरे )सध्या देशात मोदी सरकार असून या सरकारने पेपरलेस व्यवहार सुरू केले असून प्रत्येक गोष्ट ही लेखी ठेवण्याची गरज निर्माण झाल्याने मायणी येथे छोट्या मोठ्या व्यवसायासाठी ची गरज होती ती गरज ओळखून होळीच गाव येथील महेंद्र नारायण देशमुख यांनी देशमुख असोसिएट नावाने कार्यालय सुरू केले आहे या कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम आर देशमुख यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके कराड मर्चंट बँकेचे व्यवस्थापक विजय झाड यांची उपस्थिती होती आपल्या भाषणात डॉक्टर एम.आर. देशमुख म्हणाले आपल्याला सर्वांगीण विकास हवा असेल तर देशाला टॅक्स देणे गरजेचे आहे इन्कम टॅक्स भरणे ही काळाची गरज आहे देशात नंबर वन चा पाहिजे असेल तर टॅक्स भरावा लागेल टँक्स न भरणे म्हणजे देशद्रोह होऊ शकतो या वेळी अनेकांनी आय रिटर्न फाईल तयार करणार असल्याचे सांगितले या उद्घाटन सोहळ्यास विजय झाड, चंद्रकांत देशमुख ,शहाजी जाधव, बाळासाहेब माने ,शंकर खाडे, शहाजी खाडे, कराड महिला मर्चंड चे यादव साहेब दीपक देशमुख ,नंदकुमार पुस्तके ,संजय देशमुखे भवानी स्टील सेंटर चौधरी, किशोर माळी, सतीश डोंगरे ,गणेश भिसे ,सचिन नांगरे ,दस्तगीर इनामदार, उमेश राऊत राजेंद्र देशमुख, संदिप देशमुख ,प्रा. एसडी डाके,प्रा.मोहिते, डॉ. अनंतराव अरबुने,हे मान्यवर उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular