सातारा : दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् सातारा शाखेचा वर्ष 2023-25 चा पदग्रहण समारंभ सातारा बिझनेस सेंटर या सभागृहात पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष पदी आर्किटेक्ट विपुल साळवणकर यांची, तर सचिव पदी आर्किटेक्ट हर्षवर्धन टपळे, अनिरुद्ध दोशी उपाध्यक्ष व आर्किटेक्ट श्रेयस वाळिंबे यांनी खजिनदार पदाची सुत्रे हाती घेतली. नवीन कार्यकारिणी मध्ये आर्किटेक्ट शौनक कदम, आर्किटेक्ट गौतम भुर्के, आर्किटेक्ट स्नेहल शेडगे, आर्किटेक्ट प्रसन्न दागा, आर्किटेक्ट ऋषिकेश कदम, आर्किटेक्ट राखी बेमगपुरे, आर्किटेक्ट अभिजित टिळे यांचा सावेश आहे.
106 वर्ष जुन्या आय आय ए च्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट विलास अवचट, राष्ट्रीय समितीचे सचिव आर्किटेक्ट संदिप बावडेकर, राष्ट्रीय समितीचे सदस्य आर्किटेक्ट सतिशराज जगदाळे व संस्थेच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष आर्किटेक्ट संदिप प्रभू या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये हा सोहळा पार पडला.
संस्थेचे सभासद आर्किटेक्ट ययाती टपळे यांची राष्ट्रीय समितीच्या सदस्य पदी तसेच महाराष्ट्र चॅप्टर च्या सचिव पदी आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सदस्य पदी आर्किटेक्ट मयूर गांधी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
पहिल्यांदाच सातारा शाखेचे सदस्य राष्ट्रीय व राज्य पातळीवर वेगवेगळ्या पदी निवडून आले ही सातार्यासाठी अभिानाची गोष्ट आहे अशी माहिती देत ज्येष्ठ आर्किटेक्ट महेंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सातारा शाखेला देखील यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली आहे , त्याबद्दल नूतन अध्यक्ष आर्किटेक्ट विपुल साळवणकर यांनी सदस्यांचे आभार व्यक्त करत पुढील नियोजित केलेले उपक्रम जाहीर केले. कार्यक्रमाची सांगता नूतन सचिव आर्किटेक्ट हर्षवर्धन टपळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. सदरचा कार्यक्रम हा कुचे 7 या मोड्युलर किचन कंपनीने प्रायोजित केला होता.