Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीस्कॉर्पिओच्या अपघातात बडवाहाचे महाराज ठार

स्कॉर्पिओच्या अपघातात बडवाहाचे महाराज ठार

वडूज : भिगवण – पंढरपूर राज्य मार्गावर धोंडेवाडी, (ता. खटाव) गावानजीक टँकरला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी स्कॉर्पिओ पलटी झाली. या अपघातात जखमी झालेले श्रीराम महाराज रामदासी यांचा छातीला जोरदार मार बसल्याने जागीच मृत्यू झाला. काल गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला.
श्रीराम महाराज हे मूळचे गोंदवले निवासी व मध्यप्रदेशातील बडवाह येथील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे संस्थापक आहेत. या वृत्तामुळे मध्यप्रदेशच्या धार्मिक क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेल्या श्रीराम महाराजांच्या मध्यप्रदेशसह महाराष्ट्रात असलेल्या हजारो अनुग्रही शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे या अपघातानंतर बडवाह येथील जिल्हाधिकार्‍यांनी या अपघाताची दखल घेत तातडीने महाराजांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, ही सोय न झाल्याने महाराजांना उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  रात्री उशिरा पोस्टमॉर्टेम करून त्यांचा मृतदेह बडवाहसाठी रवाना करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, धोंडेवाडी ता खटाव येथे नवीन महावितरण उपकेंद्र नजीक एका टँकर ला ओव्हरटेक करून पुढे जाताना चालकाचे स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटून पलटी झाली. गाडीतून महाराजांसह दोन पुरुष शिष्य व एक महिला प्रवास करीत होते. या अपघातात महाराज गंभीर जखमी झाले होते. यावेळी तेथून प्रवास करणारे मायणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह सुहास माने, शुभम माळी, यांचेसह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने अपघातग्रस्त गाडीकडे धाव घेऊन जखमींना तातडीने सातारा सिव्हिल कडे पाठवले. उपचारापूर्वीच महाराजांचा मृत्यू झाला होता. अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular