सातारा: शहरातील छत्रपती शाहू स्टेडीयमवर दि. 8 ते 18 डिसेंबर दरम्यान सहा जिल्हे आणि गोवा राज्यातील 50 हजार इच्छुकांनी उपस्थिती दाखविली. या दरम्यान जिल्हा प्रशासनाने सरंक्षणापासून ते मैदान उपलब्ध करुन देण्यापर्यंत जे सकारात्मक सहकार्य केले.
याबद्दल सैन्य दलाच्यावतीने परिपत्रकातून आभार मानले. येथील छत्रपती शाहू स्टेडीयम व पोलीस कवायत मैदानावर 8 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान सैन्यभरती यशस्वीरित्या पार पडली. भरतीचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, सिंधूदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी आणि व गोवा राज्यातील उत्तर व दक्षिण विभागातील जिल्ह्यातील युवकांना मातृभूमीसाठी आणि देशाप्रती अभिमानाने सेवा करण्याची संधी मिळावी, यादृष्टीने सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले होते. ही भरती सामान्य सेवा जवान, सोल्जर जनरल ड्युटी (जी.डी),तांत्रिक लिपीक व भांडारपाल,तांत्रिकी जवान, उड्डाण व वाहन जवान आणि ट्रेडस्मन प्रकारातील सेवा या पदांसाठी आयोजित करण्यात आली होती.
सातारा येथील सैन्य भरती ही पुणे मुख्यालयातील भरतीविभागातर्फे कोल्हापूर आर्मी भरती कार्यालय यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती. ही भरती अत्यंत शिस्तबध्दपणे राबविण्यात आली असून या भरतीकरीता 61 हजार 162 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. भरतीस उत्सुर्त प्रतिसाद देऊन सुमारे 50 हजार उमेदवारांना मैदानावर उपस्थिती दर्शविली आहे.
रोजी सैन्य भरती प्रक्रीया दि.18 डिसेंबर रोजी समाप्त झाली असून सध्या यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम सुरु आहे.
लेखी परिक्षा जानेवारी 2018 महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सैन्य भरती यशस्वी होण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण सहकार्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे तसेच भरती प्रक्रियेला संरक्षण व सहकार्य दिल्याबद्दल सैन्य दलातर्फे आभार व्यक्त केले आहे.