सातारा : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने मराठी भाषेतील पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापनदिन म्हणजेच राज्यस्तरीय पत्रकार दिन व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेचा गौरव समारंभ शनिवार, दि.6 जानेवारी 2018 रोजी स.10:30 वाजता पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील दर्पणफ सभागृहात आयोजित केला आहे. हे कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) चे कुलगुरु, प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी विशेष सन्माननीय अतिथी म्हणून कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना विजय मांडके यांनी सांगितले की, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने राज्यात प्रथमच ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार देण्यास 1993 मध्ये सुरुवात केली. गेली 25 वर्षे हे पुरस्कार नियमितपणे दिले जातात. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील स्मरणकार्यही 1993 रोजीच सुरु झाले. त्यालाही यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. ऐतिहासिक अशा या दोन्ही रौप्यमहोत्सवी उपक्रमानिमित्त सामाजिक कृतज्ञता म्हणून संस्थेतर्फे दर्पणकारांचा वारसा जपलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रातिनिधीक सत्कार म्हणून या जिल्ह्यातील स्थानिक दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांचे संपादक, मोठ्या वृत्तपत्रांचे जिल्हा आवृत्ती प्रमुख, वृत्त वाहिन्यांचे जिल्हा प्रतिनिधी व स्थानिक केबल प्रसारण प्रतिनिधी यांचा विशेष दर्पण सन्मान या कार्यक्रमात आयोजित केला आहे. त्याचे स्वरुप विशेष दर्पण सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, जांभेकरांचे चरित्र व रंगीत छायाचित्र असे आहे. जिल्हा माहिती कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व पोंभुर्लेचे नूतन सरपंच सादिक डोंगरकर यांचाही यावेळी विशेष सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागातील पत्रकार प्रशिक्षणार्थीही उपस्थित राहणार आहेत.
दर्पणफकारांच्या जन्मभूमीत त्यांच्याच दर्पणफ स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास व दर्पणफकारांना अभिवादन करुन आदरांजली वाहण्यासाठी पोंभुर्ले परिसरातील ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व वृत्तपत्रप्रेमी नागरिकांनी अगत्याने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, विश्वस्त सुहास रत्नपारखी, अमर शेंडे, रोहित वाकडे तसेच शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.निशा पवार, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच सादिक डोंगरकर, मधुकर व सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव, जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.
पत्रकार दिनानिमित्त दर्पणकारांच्या पोंभुर्ले गावी कार्यक्रम
RELATED ARTICLES