Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीबिबट्याची दहशत सातार्‍यात कायम

बिबट्याची दहशत सातार्‍यात कायम

सातारा : शाहूपुरीतील मध्यवस्तीमधील खटावकर कॉलनी परिसरात बिबट्याने तिन जणांवर हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी पोलिस व वन विभागाच्या कर्मचार्‍यांसह शोध मोहीम सुरू केली असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. गौरव शंकर माने (वय 17, रा. शाहुपूरी), सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव ज्ञानदेव ढगाळे (वय 65),रा.शाहुपुरी खटावकर कॉलनी व सोने – चांदी व्यापारी निलेश शंकर वळीवडेकर (वय 34, रा.अवधूतचिंतन कॉलनी ,शाहुपुरी,सातारा)   असे एकूण तिन जण जखमी झाले असून वळीवडेकर यांची प्रकृत्ती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून खटावकर कॉलनी व आंबेदरे रस्त्याच्या परिसरात कुत्री भुंकत होती. त्यामुळे नागरिकांना संशय आला होता. आज सायंकाळीही कुत्री भुंकू लागल्याने युवकांनी परिसरात शोध सुरू केला.
सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरात असलेल्या एका घळीमध्ये बिबट्यासारखा प्राणी असल्याचे या युवकांना दिसले. नेमके काय आहे, हे पाहण्यासाठी गौरव माने व इतर चार ते पाच युवक त्या दिशेने गेले. त्या वेळी बिबट्याने पाठीमागून गौरववर हल्ला केला. बिबट्याचा पंजा त्याच्या मांडीवर बसला. नखे लागल्याने तो जखमी झाला.  गौरव व इतर युवकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या जवळच्या झाडीत पळाला.
आरडाओरडा पाहून परिसरातील नागरिक गोळा झाले. गौरववर बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती शाहुपुरी, तसेच शहरात पसरली. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. शाहुपुरी पोलिस व वन विभागाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. त्यांनी युवकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील नागरिक विजेचे दिवे व दरवाजे बंद करून बसले होते. गेल्या काही दिवसांपासून डोंगरावर वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा बिबट्या खाली आला असल्याची शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात येत होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular