Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीथोरवेवाडी येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचे आगमन

थोरवेवाडी येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचे आगमन

पुसेसावळी: खटाव तालुक्यातील थोरवेवाडी(पुसेसावळी)येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचे आगमन झाले.थोरवेवाडी ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानच्या दादासाहेब मोकाशी कृषी विद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी आहेत. सुमारे तीस प्रात्यक्षिकासह शेतीतील नवीन तंत्रज्ञान, माहिती व त्यांची प्रात्यक्षिके शेतकर्‍यापर्यंत पोहोचवली जाणार आहे.यात अंकुश चौगुले,उत्कर्ष तिरखुंडे,प्रवीण जाधव,गणेश होळकर,स्वप्नील भोसले,यशवंत शेळके,अमोल पानसरे या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. प्राचार्य एस.एम.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम सुरू आहे.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.एस.जी.कांबळे व कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.व्ही.टी.बागल काम पाहत आहेत.कृषिदूतांचे स्वागत उपसरपंच सूर्यकांत कदम,पोलीस पाटील गणेश थोरात यांनी केले.यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular