Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीतिरंगा एज्युकेशन सोसायटी व भुईंज प्रेस क्लब यांचा अनोखा उपक्रम

तिरंगा एज्युकेशन सोसायटी व भुईंज प्रेस क्लब यांचा अनोखा उपक्रम

भुईंजः पुस्तक प्रदर्शनातून थेट वाचकाच्या हातात जाण्याची संकल्पना तिरंगा एज्युकेशन सोसायटी तसेच भुईंज प्रेस क्लब यांचा संयु्क्त उपक्रम तालुक्यातील पहिला उपक्रम असून त्याचे अनुकरण गाव निहाय झाल्यास र्खया अर्थाने ग्रंथ प्रदर्शन यशस्वी झाल्याचा मनस्वी आनंद मिळेल असे प्रतिपादन नंदकुमार खामकर यांनी केले.
पाचवड ता.वाई येथे पुस्तक प्रदर्शनातून थेट वाचकाच्या हातात जाण्याची संकल्पना तिरंगा एज्युकेशन सोसायटी व अजब प्रकाशन पुणे यांच्या सहाभागाने 19 मार्च ते 24 मार्च 2019 च्या दरम्यान मराठी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यांच्या समारोप कार्यक्रमास हरिहरेश्‍वर बॅकेचे संस्थापक नंदकुमार खामकर बोलत होते. अध्यक्ष स्थानी वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्‍वास पवार तर प्रमुख वक्ते म्हणून विठ्ठल माने होते.
यावेळी बोलताना नंदकुमार खामकर म्हणाले की तिरंगा इंग्लिश मेडीयम स्कुलच्या माध्यमातून वाई तालुक्यात ओळख निर्माण करणारे जयवंत पवार यांनी नेहमीच राजकारण बाजूला ठेवून समाजकारण जपले आहे. त्यांना भुईंज पे्रस क्लब व वाई तालुका पत्रकार संघ यांनी लोकोपयोगी कार्यक्रमाची दिशा दिली. त्यात अजब प्रकाशनने कोणते हि पुस्तक फक्त 70 रूपयांत देवून ग्रामीण भागात वाचकाच्या हातात पुस्तक देण्याचे हे समाज हिताचे काम घडले आहे. यापुढे आपण ही असे कार्यक्रम वाई शहरात राबवणार असून त्यास पत्रकारांनी सहकार्य करावे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अजब प्रकाशनचे मनोज साळुंखे यांचा सत्कार मान्यवरांनी केला.
कार्यक्रमास भद्रेश भाट़े विलास साळुंखे़ जयवंत पिसाऴ कृष्णात घाडगे़ किशोर रोकडे़ पांडुरंग खरे़ संजय माटे उपस्थित होते. स्वागत जयवंत पवार यांनी केले. आभार कृष्णात घाडगे यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular