Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसलग सुट्टयांमुळे महामार्गावर वाहनांची ठिकठिकाणी मोठी कोंडी

सलग सुट्टयांमुळे महामार्गावर वाहनांची ठिकठिकाणी मोठी कोंडी

सातारा : शनिवार रविवार आणि नाताळ या सलग सुट्टयांमुळे महामार्गावर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा,  शिवापूर, आनेवाडी टोलनाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. या वाहनांमुळे महामार्गावर वाहनांची ठिकठिकाणी मोठी कोंडी झाली होती.
सलग दोन दिवस या महामार्गावर ही वाहतूकीची कोंडी होत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुंबई, पुणे तसेच कोल्हापूर येथील पर्यटक थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी  घाटमाथ्याजवळ व इतर ठिकाणी जाण्यास पसंती देतात. पर्यटकांची संख्या वाढल्याने परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला. पुणे-बंगळूर द्रुतगती महार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. तर खंबाटकी घाटातही वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे 10 मिनिटात पार होणारा खंबाटकी  घाट पार करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास मोजावे लागत होते.
शिवाय, नववर्ष स्वागताला गोव्याकडे जाणार्‍या प्रवाशांचीही मोठी गर्दी असल्याने सातारा ते कोल्हापूर मार्गे गोवा  या महामार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.शनिवार रविवार आणि नाताळ या सलग सुट्टयांमुळे महामार्गावर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा  शिवापूर, आनेवाडी टोलनाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. या वाहनांमुळे महामार्गावर वाहनांची ठिकठिकाणी मोठी कोंडी झाली होती.
सलग दोन दिवस या महामार्गावर ही वाहतूकीची कोंडी होत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुंबई, पुणे तसेच कोल्हापूर येथील पर्यटक थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी  घाटमाथ्याजवळ व इतर ठिकाणी जाण्यास पसंती देतात. पर्यटकांची संख्या वाढल्याने परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला. पुणे-बंगळूर द्रुतगती महार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. तर खंबाटकी घाटातही वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे 10 मिनिटात पार होणारा खंबाटकी  घाट पार करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास मोजावे लागत होते.
शिवाय, नववर्ष स्वागताला गोव्याकडे जाणार्‍या प्रवाशांचीही मोठी गर्दी असल्याने सातारा ते कोल्हापूर मार्गे गोवा  या महामार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular