वाईः ट्रेकिंग म्हणजे साहसी क्रिडा प्रकार असून या खेळामध्ये आपल्या शारिरिक क्षमतेची वारंवार कसोटी लागत असते. प्रामुख्याने शारिरिक तंदुरूस्ती व महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटाचा ऐतिहासिक वारसा लागला आहे. या गडकोटवर जावून तिथे असणार्या ऐतिहासिक व भौगोलिक स्थळांबद्दल माहिती घेणे, तिथला इतिहास समजून घेणे व छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या विचारांची आदर्शवत अशी युवा पिढी निर्माण करणे. या साहसी क्रिडा प्रकाराचा समाजातील तळागाळातल्या युवाकांपर्यंत प्रसार व प्रचार करणे. यामध्ये युवकांचा आत्मविश्वास वाढीबरोबर निरोगी आरोग्य ही राखण्यास मदत होते. यासाठी सामान्य कुंटूंबातील युवकांनी अनेक अडचणींना तोंड देत छंद जोपासला आहे. आतापर्यंत छोटया मोठया 65 यशस्वी मोहिमा केल्या अशी माहिती योध्दा प्रतिष्ठान वाईचे अध्यक्ष रणवीर गायकवाड यांनी दिली.
याविषयी अधिक माहितीदेत असताना रणवीर गायकवाड म्हणाले एखादी नवीन मोहिमेची आखणी करतो तेव्हा तेथे असणार्या भौगोलिक रचनेची माहिती घेवून जसे कि गडाची उंची, चढण, लागणारा वेळ, या सगळयांचे नियोजन करून त्याची पूर्वतयारी म्हणून जसेकि, रोज सकाळी उठून मैदानवरती धावणे, अथवा घरापासून काही किलोमीटर अंतर चालत जाणे, बॉडी स्ट्ेचिंग, पायाचे इतर व्यायाम सिंगल बार, डबल बार, जोर, बैठका इ. सराव केला जातेा. यासाठी ट्किंग-मोठी सॅक, ट्ेकिंगचे शूज, स्लिंगरोप, फुलस्लिव्ज, टिषर्ट ट्ॅकपॅट, हॅट, स्लिपींग बॅग,प्रथमोपचार पेटी, पुस्तक, नकाशा वॉटर बॉटल, बॉटरी, नोंदव ही. रॉकक्लाइबिंग वरॉपलिंगसाठी लागणार साहित्य डायनॅमिक रूप, स्टॉटिकरोप, हेल्मेट , हार्नेस , कॅरॅबिनर, डिसेंडर, हॉण्डग्लोज, स्लिंगरोप, अॅकर, बोल्ट, फे्रण्डस, चोल्कनट इत्यादी साहित्य लागते
योध्दा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आत्तापर्यंत यशस्वी केलेल्या मोहिमा : 5ते 7 वर्षामध्ये महाराष्ट्रातील 65 किल्ल्यांची यशस्वी चढाई राजगड ते तोरणा 27 कि.मी अंतर अवघ्या 6 तासात पायी चालत पूर्ण अंधारबन पिंपरी ते भिमाडॅम 15 कि.मी. अंतर पायी चालत 3 तास. मेटतळे ते प्रतापगड 11 कि. मी पायी चालत. वाई ते मांढदेव जाऊन येवून 30कि.मी 5 तासात पायी चालत पूर्ण केले. प्रस्थारोहण मोहिमा क्लाईबिंग (कातळारोहण) ट्रेकहरिहरगड नाशिक, कलावंतीण दूर्ग-पनवेल, ढाकचाबहिरी-लोणवळा,अलंग-मदन-कुलंग-नाशिक, कलकराय सुळका-सुळका तैलबैला-लोणवळा, 7 हजार तीनशे फूट उंचीचा महाराष्ट्रातील सर्वांत अवघड समजला जाणारा लिंगाणा सुळका. इत्यादी यशस्वी ट्रेक व क्लाईबिंग केेले आहे. यामध्ये रणवीर गायकवाड, अक्षय पवार , तुषार घोरपडे ,सुरज घेारपडे, प्रसाद भोसले, दिलीप रवळेकर, संकेत मराठे, सत्यजित अमराळे, आनंद पवार, गणेश मराठे, विशाल वरे, सोहम घोरपडे, अर्थव यादव, सचिन पोतेकर, स्वरूप यादव, सुज्ञेश गायकवाड, प्रसाद सोनवणे यांच्यासह अनेक योध्दा प्रतिष्ठानचे युवक उस्फृर्तपणे सहभागी होत असतात. योध्दा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गंगापुरी, वाई परिसरात गणेशजयंतीच्या माध्यमातून प्रबोधनपर देखावे, अंधश्रध्दा, व्यसनमुक्ती तसेचलहान मुलांना उन्हाळयाच्या सुटट्ीत मोफत क्रिडा व कौशल्य विकास शिबिरांचे आयोजन केले जाते. प्रतिष्ठानच्या कामाची पोहोच पावती म्हणून आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.

