मेढा प्रतिनिधी – वृक्षांच्या रोपाची लागवड करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून सर्वांनी या निसर्ग संपत्तीचे रक्षण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. पराग कोडगुले यांनी केले.
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत वसुधा वंदन अंतर्गत
मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. पराग कोडगुले साहेब यांचे मार्गदर्शना खाली मेढा शहरातील एस.टी. डेपो या ठीकाणी वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.यावेळी कार्यक्रमास मेढा एस.टी. डेपो आगाराच्या व्यवस्थापक श्रीमती निता बाबर – (पवार) मॅडम , तसेच मेढा नगरपंचायतीच्या करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्राजक्ता शिंगाडे मॅडम स्थापत्य अभियंता श्री प्रदीप साबळे साहेब आरोग्य विभाग प्रमुख श्री. प्रमोद कुंभार, शहर समन्वयक श्री. स्वप्निल देशमुख , लेखाअधिकारी श्री.रोशन गायकवाड ,स्थापत्य अभियंता सहाय्यक श्री.मंगेश गोरेआदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.विकास जवळ ,श्री.सचिन करंजेकर , श्री.आशिषकुंभार ,श्री.संजय .जवळ ,श्री.शुभम जवळ ,श्री.आबासाहेब देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
वृक्षांच्या रोपाची लागवड करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज :- पराग कोडगुले
RELATED ARTICLES