मायणी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना मायणीत काव्यमय श्रद्धांजली वाहण्यात आली. येथील उत्तमराव सपकाळ फाऊंडेशन च्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप व अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. . काव्यमफैलीचा दीपक पवार यांनी वाजपेयी यांच्या गाजलेल्या कवितेने मैफलीला सुरूवात झाली. पवार यांनी अटलजींच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. कवी रमजान मुल्ला (नागठाणे) यांनी आईची महिती सांगणारी गेय कवितेने रसिक चिंब झाले. मिलिंद कांबळे यांनी जागतिकीकरणाच्या रेट्यात उदवस्त होणारी खेडी यावर भाष्य करणारी कविता सादर केली. रसिक अंतरमुख झाले. तनिष्का गायकवाड हिने सादर सादर केलेल्या कथेला मनमुरादपणे दाद दिली. बदलत्या कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारी कथा सादर केली. प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी चिवळ्याचं लग्न कथा सादर केली. यावेळी शालेय विद्यार्थींना वह्या वाटप केल्या. आमदार अनिल बाबर विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील इंडिया गोल्ड अॅन्ड सिल्व्हर रिफायनरीचे अध्यक्ष प्रतापदादा साळुंखे, उपाध्यक्ष गणपतराव पुदाले, संचालक शहाजीशेठ पाटील, सरपंच सचिन गुदगे संजय माने , पलूस नगरपंचायत गटनेते सुहास पुदाले बाजार समितीचे संचालक जयसिंग कदम जयंत कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक उत्तमराव सपकाळ यांनी केले. आभार मिलिंद देशमुखे यांनी मानले. संयोजन रमेश सपकाळ व सुरेश सपकाळ ,नंदकुमार सुखदरे यांनी केले.
मायणीत अटलजींना काव्यमय श्रद्धांजली ; वास्तुशांतीला शाळेतील मुला मुलींना वही वाटप ; उत्तमराव सपकाळ फाऊंडेशनचा उपक्रम
RELATED ARTICLES